💥योजना लवकरात-लवकर रद्द करण्यात आली नाही तर ८ ते १० दिवसांत जिल्हास्तरावर तीव्र आंदोलनाचा इशारा💥
डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक संघटनेकडून केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या अग्निपथ योजने विरुद्ध आज जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारकडून अग्निपथ व अग्निविर ही योजना जाहीर करण्यात आली आहे, जी की देशातील तरुणविरोधी आणि देशाच्या सुरक्षेविरोधी आहे. देशात खूप साऱ्या क्षेत्रात कंत्राटीकरण पद्धत सुरू झाली आहे आणि आता सुरक्षा क्षेत्रातही तशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. अग्निपथ ही पद्धत सुरू झाली तर ४ वर्षाच्या सर्व्हिस नंतर फक्त २५% तरुणांनाच नंतर सेवेत रुजू करणार आहेत म्हणजेच बाकी ७५% तरुण बेरोजगारीच्या खाईत पुन्हा ढकलले जाणार आणि हाच बेरोजगार तरुण पुढे मिळालेल्या सैनिकी शिक्षणाचा गैरवापर सुद्धा करू शकतो. त्यामुळे सरकारने ही अग्निपथ सारखी योजना रद्द करून पूर्वीसारखीच सैनिक भरती करून तरुणांना लष्करी सेवेत रुजू करून घ्यावे असे डी वाय एफ आय या तरुणांच्या संघटनेकडून निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे. यासोबतच ही योजना लवकरात- लवकर रद्द करण्यात आली नाही तर ८ ते १० दिवसांत जिल्हास्तरावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा डी वाय एफ आय संघटनेकडून देण्यात आला आहे. या निवेदनावर डी वाय एफ आय संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील तारे, जिल्हासचिव नसीर शेख, जिल्हाउपाध्यक्ष क्रांती बुरकुंडे व जिल्हाउपाध्यक्ष अमन जोंधळे, पूर्णा तालुका सहसचिव अजय खंदारे, मानवत तालुकाउपाध्यक्ष अक्षय महाडिक, दत्ता श्रावणे, पूर्णा शहराध्यक्ष सुमित वेडे, मोनिका पडघन, पांडुरंग हारमोडे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत....
0 टिप्पण्या