💥पुर्णा येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता नागनाथ बरदाळे यांचे दुःखद निधन..!


💥शासकीय कंत्राटदार राहुल बरदाळे यांचे ते वडील होत💥

पुर्णा (दि.२४ जुन २०२२) - येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता नागनाथअप्पा शंकरअप्पा बरदाळे यांचे आज शुक्रवार दि.२४ जुन २०२२ रोजी मध्यरात्री ०३-०० वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.


तालुक्यातील शासकीय अधिकारी/कर्मचारी वर्गासह शेतकरी सर्वसामान्य जनतेत अत्यंत मनमिळावू व्यक्तीमत्व  म्हणून परिचित असलेले स्व.नागनाथ बरदाळे साहेब  शासकीय कंत्राटदार राहुल बरदाळे यांचे वडील होते त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली जावाई नातवंड असा मोठा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी शहरातील लिंगायत स्मशान भूमी येथे दुपारी ०२-०० वाजता होणार आहे...

इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व बरदाळे कुटुंबास या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती हिच इश्वरा चरणी प्रार्थना....🙏🏻

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या