💥स.लड्डूसिंघ महाजन अमृत महोत्सवाची तयारी शेवटच्या टप्प्यात : ओमप्रकाश पोकर्णा


💥26 जून रोजी साजरा होणार अमृतमहोत्सव पालकमंत्री अशोकराव चव्हाण प्रमुख उपस्थिती💥  

नांदेड (दि.21 जून 2022) : शीख समाजातील ज्येष्ठ नेते गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे माजी अध्यक्ष स. लड्डूसिंघ महाजन यांच्या अमृतमहोत्सवी जन्मोत्सव कार्यक्रमाची तयारी शेवटच्या टप्प्यात आली असून पंजयारे साहिबान आणि संतांच्या आशीर्वादादाने व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री अशोकरावजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली येत्या दि. 26 जून रोजी कार्यक्रम पार पडणार आहे. अशी माहिती अमृतमहोत्सव संयोजन समितीचे प्रमुख माजी आमदार श्री ओमप्रकाश पोकर्णा यांनी एका प्रसिद्धी पत्राकान्वय दिली आहे. 


येत्या 26 जून, 2022 रोजी तखत सचखंड हजुरसाहेबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी व आदरणीय पंजप्यारे साहिबान, संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवावाले, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, गुरुद्वारा मातासाहेबदेवाजी येथील जत्थेदार संतबाबा तेजसिंघजी यांच्या पवित्र सन्निध्यात अबचल नगर येथील बाबा फतेहसिंघजी मंगल कार्यालय येथे सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम सुरु होणार आहे. कार्यक्रमासाठी भव्य अशा मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. संयोजन समिति मार्फत सर्व कामे सुरु असून रविवारी वेळेनुसार कार्यक्रम होईल असे पोकर्णा यांनी नमूद केले आहे. 

कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तसेच राज्याचे पालकमंत्री मा.ना. श्री अशोकरावजी चव्हाण यांच्या सह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. वरिष्ठ आणि अनुभवी नेते असलेले स. लड्डूसिंघ महाजन यांच्या अमृतमहोत्सव जन्मोत्सव सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे खासदार श्री एस. एस. अहलूवालिया, लोकसभेचे माजी उपसभापति श्री चरणजीतसिंघ अठवाल, माजी मंत्री महाराष्ट्र व माजी खासदार श्री भास्करराव जी पाटिल खतगावकर, माजी केंद्रीय राजयमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटिल, माजी उपसभापति आणि माजी राजयमंत्री श्री कमलकिशोर कदम, माजी राज्यमंत्री डॉ माधवरावजी किन्हाळकर,  माजी राज्यमंत्री श्री डी. पी. सावंत, नांदेड जिल्ह्याचे खासदार श्री प्रतापराव पाटिल चिखलीकर, हिंगोलीचे खासदार श्री हेमंत भाऊ पाटिल, माजी खासदार श्री चंद्रकांत खैरे, विधानपरिषद सदस्य श्री अमरनाथ राजुरकर, नांदेड दक्षिणचे आमदार श्री मोहनराव हंबर्डे, नांदेड उत्तरचे आमदार श्री बालाजी कल्याणकर, नांदेडच्या महापौर श्रीमती जयश्री निलेश पावडे सह जिल्ह्याचे सर्व आमदार आणि अनेक क्षेत्रातील व्यक्तीमत्वांची उपस्थिती असणार आहे. 

माजी आमदार पोकर्णा यांनी आवाहन केले आहे की शहराचे वरिष्ठ व्यक्तिमत्व स. लड्डूसिंघ महाजन यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सर्वपक्षीय मान्यवरांनी उपस्थित राहावे.वरील कार्यक्रमात सर्वधर्मीय व सर्वपक्षीय निमंत्रित पाहुणे आणि स्थानीक शीख समाजातील नागरिक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सोहळा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीतर्फे शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचेही पोकर्णा यांनी म्हंटलं आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या