💥परभणी जिल्हा परिषद अंतर्गत तत्कालीन २ शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल...!


💥शिक्षणाधिकारी पदाचा गैरवापर करीत शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी दाखल करण्यात आले गुन्हे दाखल💥

परभणी (दि.२१ जुन २०२२) - परभणी जिल्हा परिषद अंतर्गत तत्कालीन शिक्षणाधिकारी सौ. सुजाता पाटेकर व सौ. वंदना वाहुळ यांनी आपल्या पद व अधिकाराचा गैरवापर करीत शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी कोतवाली पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की येथील कोतवाली पोलिस स्थानकात महंमद मुश्ताक अहेमद पिता मोहमद अली शहा वय ५१ वर्षे संस्थेचे सचिव कामेत एज्युकेशप सोसायटी परभणी रा.युसुफ कॉलनी परभणी यांनी एक तक्रार दाखल केली त्यातून श्रीमती डॉ. वंदना अभिजीत वाहुळ वय ४८ वर्षे धंदा शिक्षणधिकारी रा. शिक्षणधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद परभणी व श्रीमती डॉ.सुचिता आनंद पाटेकर वय ५२ वर्षे धंदा शिक्षणधिकारी रा.शिक्षणधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद परभणी या दोघांसह त्या शाळेतील श्रीमती खायमखानी शहनाज बानो वय ५६ वर्षे धंदा मुख्याधापिका रा.डॉ. मोहमद इकबाल उर्दू हायस्कुल काद्राबाट प्लाट परभणी व सिद्दिकी मोहमद शरफोद्दिन पि.मोहम्मद फैजोद्दीन वय ४० वर्षे धंदा सहशिक्षक रा.व्ही.आय.पी.प्रोव्हीजन समोर युसूफ कॉलनी वांगी रोड परभणी श्रीमती शबाना बेगम पि.खुर्शिद अली भ्र.अशफाक अली शहा वय ४१ वर्षे धंदा सहशिक्षक रा. अशफाक अली शहा युसूफ कॉलनी वांगी रोड परभणी. यांच्या विरूध्द मार्च २०१९ ते जुन २०२० या दरम्यान खोटी बिले तयार केल्याबद्दल ठपका ठेवला.

वाहुळ व पाटेकर या शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापिका यांचे शासकीय अधीकार काढुन घेवुन अनुउपस्थित शिक्षक  यांना पगार काढण्यासाठी लागणारे स्वाक्षरीचे अधीकार दिल्याने या पैकी एका शिक्षकांने स्वत ला स्वयंघोषीत मुख्याध्यापक ठरवुन खोटे दस्त, शिके तयार करून आपसात संगनमत करून शासनाचे "नो वर्क नो पेमेंन्ट" आदेशाचे उल्लघन करून अनुउपस्थीत असलेल्या शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी यांना पगार देवुन शासन निधीचा जाणीवपूर्वक ७४९०४९६/- रुपयाचा अपहार केला. दरम्यान या तक्रारीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी या चौघांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४०८,४०९,४१९,४२०,४६८,४७१,४९९,५०१ व ३४ भादंवि.प्रमाणे गुन्हा दाखल केला.पोलीस निरीक्षक जऱ्हाड यांनी श्री तुरनर यांच्याकडे तपास दिला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या