💥पाऊस लांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत अद्यापही समाधान कारक पाऊस नसल्याने शेतातील ढेकळे पण तशीच....!


💥अन्नदाता शेतकऱ्यांना प्रतीक्षा फ़क्त पावसाची💥

 शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली मात्र जिल्ह्यातील काही तालुक्यातील समाधानकारक पाऊस पडला तर काही तालुक्यात अद्यापही एक हि पाऊस समाधानकारक झाला नाही.

सेनगाव तालुक्यातील साखरा.हिवरखेडा बोरखेडी.खडकी. धोतरा .केलसूला या सह परिसरातील अनेक गावांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नाही त्यामुळे शेतीचे कामे देखिल खोळंबली आहेत आत्ता पर्यन्त शेतातील नांगरणीचे ढेकळे पण तसेंच आहेत शेतात .वखरनि   करायची पण पाऊसन झाल्या मुळे हें शेतातील ढेकळे  फुटत नाहीत आत्ता बळीराजा आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत .खत बि बियाणे सर्व शेतकऱ्यांनी आणून ठेवले आहेत आत्ता प्रतीक्षा फ़क्त पावसाची आहे

यावर्षी हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज जवळपास खरा ठरत आहे मात्र हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा .हिवरखेडा केलसूला खडकी धोतरा .बोरखेडी या सह परिसरातील अनेक गावांमध्ये समाधानकारक पाऊस पडला नाही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्याला सुरुवात केली आहे मात्र सेनगाव तालुक्यातील अनेक गावामध्ये अद्यापही समाधान कारक पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत खरिपाच्या पेरण्या 15जुन  नंतर होतील अशी आशा शेतकऱ्याना होती मात्र  पाऊस नसल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत जोपर्यंत पावसाची नोंद 70ते 80 मिली मीटर नोंद झाल्या नंतरच पेरणी करावी असे आव्हान कृषी विभागाकडून केले जात आहे आत्ता कधि मान्सून येतों आणि कधि पेरण्या होतात हि चिंता शेतकऱ्यांना लागली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या