💥जिंतूर औंढा महामार्ग रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तीन जण गंभीर जखमी....!


💥जखमींना प्राथमिक उपचार शासकीय रुग्णालयात करुन पुढील उपचारासाठी हलविण्यात आले💥

जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी. रामपूरकर

जिंतूर औंढा महामार्ग रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकी परस्पर भिडल्या. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली असून, जखमींना प्राथमिक उपचार शासकीय रुग्णालयात करुन पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

   - जिंतूर-औंढा महामार्ग रस्त्यावर आज रविवार रोजी दुपारी ४ च्या सुमारास दोन दुचाकी भरधाव वेगात परस्पर भिडल्याने झालेल्या अपघाताची माहिती महामार्ग पोलिस निरीक्षक गणेश कदम, पो.कॉ.शेख शकील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

  त्या ठिकाणी 23 वर्षीय अमर हरिभाऊ जगताप रा.पुंगळा ता.जिंतूर आणि घाटनादुर ता.आंबेजोगाई येथील रहिवासी   अनिता साहेबराव शेरे(३०) आणि  साहेबराव गोरख शेरे (३५)हे तिघे जखमी अवस्थेत आढळून आले. महामार्ग पोलिसांसह अमोल देशमुख, नागेश आकात आदींनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.

  रुग्णालयातील  डॉ.गजानन काळे, गंगाधर पालवे, बालाजी नेटके, कटारे, सिस्टर शिंदे आदींनी प्राथमिक उपचार केला. दरम्यान यात साहेबराव शेरे यांच्या उजव्या पायाला गंभीर मार लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या