💥परभणी येथील ओंकार भजनी मंडळाच्या वतीने पंढरपूर पायी दिंडीतील वारकऱ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप...!


💥ओंकार भजनी मंडळाकडून मागील पाच सहा वर्षांपासून दरवर्षी जवळ जवळ 40 ते 50 दिंड्यांना कापडी पिशव्या वाटप💥

परभणी (दि.२६ जुन २०२२) - ओंकार भजनी मंडळ परभणी यांच्या वतीने दर वर्षीप्रमाणे याही वर्षी परभणी शहरातून पंढरपूर कडे जाणाऱ्या पायी दिंडीतील वारकरी यांना उपयोगी अशा कापडी पिशव्या चे वाटप करण्यात येत आहे.


ओंकार भजनी मंडळ दर वर्षी पंढरपूरकडे आषाढी एकादशी निमित्त विविध दिंड्यातील पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची काही तरी सेवा घडावी यासाठी दर वर्षी उपक्रम राबवत असतो ओंकार भजनी मंडळाने वारकऱ्यांना कधी चहा नाश्ता, तर कधी रेनकोट वाटप आदी सेवा दिली आहे.

मागील पाच सहा वर्षांपासून दरवर्षी जवळ जवळ 40 ते 50 दिंड्याना कापडी पिशव्या वाटप करत असतो..पण ही परंपरा मागील दोन वर्षांपासून कोरोना मुळे खंडित झाली होती.....दोन वर्षांच्या अंतराने या वर्षी पुन्हा नव्या जोमाने व जास्त संख्येने वारकरी पायी दिंडीत वारकरी सहभागी झाले आहेत....

संत गुलाब बाबा संस्थान काटेल ता. संग्रामपूर जिल्हा बुलढाणा या दिंडीतील वारकऱ्यांना कापडी पिशव्या वाटप करताना हभप अँड सच्चिदानंद महाराज कुलकर्णी, टोपाजीराव फुलपगार, नरेंद्र शुक्ल, अनंत कदम, सुधीर चिद्रवार, लक्ष्मीकांत कुलकर्णी, दिलीप पदमवार, अशोक कान्हेकर ,गजानन गुंडाळे, नारायण वाघ, अभिजित फुलपगार आदी उपस्थित होते..टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या