💥पिंपळा लोखंडे जिल्हा माध्यवर्ती बँक शाखेतील कर्मचाऱ्याकडून प्रहार जनशक्तीच्या उपतालुकाप्रमुखाला धक्काबुक्की...!


💥मुजोर कर्मच्याऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी💥

पूर्णा (दि.२९ जुन २०२२) - तालुक्यातील पिंपळा लोखंडे येथील जिल्हा माध्यवर्ती शाखेतील मुजोर कर्मचाऱ्याने दि.२८ जुन २०२२ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या उपतालुका प्रमुखांना शेतकऱ्याच्या मिळणाऱ्या अनुदाना संदर्भात विचारपूस केली असता.सदरील बंकेतील मुजोर कर्मचाऱ्याने शिवीगाळ करत धकाबुकी केली.

सदरील कर्मचारी शाखा व्यवस्थापक यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हा मध्यवर्ती शाखा पूर्णा या ठिकाणी बँकेचे इन्स्पेक्टर काळे यांना निवेदन देऊन.सदरील कर्मच्याऱ्यावर तातकाळ कारवाई करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष मुख्य शाखा परभणी या ठिकाणी आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला.

या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नरेश जोगदंड तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के उपतालुका प्रमुख बाबन ढोणे शहर प्रमुख संजय वाघमारे मंचक कुऱ्हे श्रीहरी इंगोले रमेश जाधव विठ्ठल बुचाले संतोष नागठाणे भाऊसाहेब गव्हाणे शे. मोईन. शे नईम. संतोष जोगदंड नागेश झिंझाडे आदी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठया प्रमाणात हजर होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या