💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभरातील महत्वाचे अपडेट / हेडलाईन्स / बातम्या...!


💥नबाब मलिकांच्या अडचणीत वाढ,मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी ; सर्वाेच्च न्यायालयात याचिका💥

✍️ मोहन चौकेकर

* दहावीचा निकाल उद्या दि.17 जून रोजी दुपारी 1 वाजता लागणार ; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

* पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, राधानगरी,भुदरगड आणि गगनबावडा तालुक्यातही पावसाने दडी मारली ; सर्वच तालुक्यांमध्ये तुलनेत अत्यल्प पाऊस

* नबाब मलिकांच्या अडचणीत वाढ,मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी ; सर्वाेच्च न्यायालयात याचिका

* धक्कादायक : ऑनलाईन क्लासमध्ये 89 टक्के विद्यार्थ्यांची हेरगिरी,मुलांची खासगी माहिती कंपन्यांना विकली

* 'अग्निपथ' योजनेवरून आंदोलनाचा वणवा पेटला ; बिहारमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, ट्रेनची जाळपोळ 

 * अखेर विदर्भात मान्सूनचे आगमन हवामान विभागाच्या नागपूर विभागाची माहिती;* पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

* 'विधानपरिषदेच्या निवडणुकीत आम्ही वेगळा डाव आखणार' - रावसाहेब दानवे

* कोरोनानंतर मुंबईकरांसमोर उभे राहिले नवे संकट ; मलेरिया आणि गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले 

* जुहु येथील 'अधीश' बंगल्यावरील कारवाई प्रकरणी नारायण राणेंना तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

* 'पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात  अजित पवारांना न बोलू दिल्या प्रकरणी माध्यमांकडुन देवस्थानाला बदनाम करण्याचा प्रयत्न'  -संस्थानचे अध्यक्ष संतापले  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या