💥नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते तथा कामगार सेना पदाधिकारी श्याम पाटील वानखेडे यांना मातृशोक...!

 💥मातोश्री ललिताबाई गणेशराव पाटील वानखेडे यांचे दुःखद निधन💥

नांदेड (दि.१२ जुन २०२२) - जिल्ह्यातील शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते तथा कामगार सेनेचे पदाधिकारी श्यामभाऊ गणेशराव पाटील वानखेडे यांच्या मातोश्री ललिताबाई गणेशराव पाटील वानखेडे यांचे काल शनिवार दि.११ जून २०२२ रोजी रात्री ०७.३० वाजेच्या सुमारात दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा आज रविवार दि.१२ जून २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता त्यांचे राहते घर माळटेकडी साहिब गुरुद्वारा,(म्हाळजा). येथून निघेल व नांदेड येथील गोदावरी नदीच्या पात्रावरील गोवर्धन घाट येथे अंत्यविधी होणार आहे.

शोकाकूल ;

श्री.श्याम गणेशराव पाटील वानखेडे (मुलगा),गणेशराव पा.वानखेडे (मुलगा),लक्ष्मीकांत तुकाराम पाटील पुयड (भाऊ), सुभाष भिमराव पा.पुयड (भाचा) व समस्त वानखेडे पाटील परिवार 

इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व वानखेडे पाटील परिवारास या दुःखातून सावरण्याचे बळ देवो हिच इश्वरा चरणी प्रार्थना..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या