💥पुर्णा नगर परिषदेतील प्रत्येक चौकश्या गुलदस्त्यात अन् माल मात्र घोटाळेबाजांच्या बस्त्यात...!


💥चौकशी अधिकारी निपटतात घोटाळेबाजांची प्रकरण सस्त्यात ?💥 

पुर्णा (दि.०३ जुन २०२२) - पुर्णा नगर परिषदेतील भ्रष्ट व बेजवाबदार अधिकारी/कर्मचाऱ्यांनी एकंदर सर्वच घोटाळ्यांमध्ये हद्दपार केल्याचे निदर्शनास येत असून 'भ्रष्ट बेईमान अधिकारी/कर्मचाऱ्यांना महाभ्रष्ट चौकशी अधिकारी मग त्याला कोण मारी ?' अशी अवस्था नगर परिषदेत झाल्यामुळे नगर परिषद प्रशासनात कार्यरत भ्रष्टाचाऱ्यांची हिंमत कमालीची वाढल्याचे निदर्शनास येत असून नगर परिषदेतील घोटाळेबाज आता बेलगाम झाल्याचे निदर्शनास येत असून त्यातच नगर परिषद मुख्याधिकारी पदाचा पदभार नव्यानेच स्विकारलेले मुख्याधिकारी अजय नरळे यांची अवस्था 'निम हकीम खतरे जान' अशी झाल्यामुळे भ्रष्टाचारात डबल पिएचडी केलेल्या आस्थापणा विभागातील घोटाळ्यांचे सुत्रधार मुख्य लेखापाल नंदलाल चावरे,प्रशासकीय अधिकारी शेख इमरान शेख अशफाक,शासकीय विकासनिधीची बोगस कामांना प्राधान्य देऊन सोईस्कररित्या विल्हेवाट लावणारे कनिष्ठ अभियंता संजय दिपके,बोगस कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरासह  नामांतरांना प्रोत्साहन देणारे गणेश रापतवार ,नगर परिषदेसह मुख्याधिकाऱ्यांच्या खोट्या सह्यांसह शिक्क्याचा वापर करीत बोगस रहिवासी प्रमाणपत्र,जन्म/मृत्यू प्रमाणपत्र तसेच बोगस बांधकाम मजूर अनुभव प्रमाणपत्रांचा घोटाळा करणारे स्वच्छता निरिक्षक नईम खान पठाण यांना जनुकाही सुवर्णसंधीच प्राप्त झाल्याचे निदर्शनास येत असून यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करा किंवा आयुक्तांकडे प्रत्येक तक्रारी नंतर निघालेल्या चौकशी आदेशाला सोईस्कररित्या केराची टोपली दाखवून वरिष्ठांच्या चौकशी आदेशावर सोईस्कररित्या लघुशंका करीत घोटाळ्यांचे मालिका चालवली जात आहे.

पुर्णा नगर परिषदेतील भ्रष्ट घोटाळेबाज अधिकारी/कर्मचाऱ्यांनी शहरातील उच्चभ्रू वसाहतीतील सर्वे नं.१४ गायरान ११ हेक्टर ३ आर अर्थात जवळपास ३० एक्कर शासकीय जमीन खोट्या कागदपत्रांच्या आधारे रिव्हीजन रजिष्टरला नोंदी करुन भुखंड माफियांच्या घश्यात घालण्याचे काम सोईस्कररित्या केले परंतु अनेक तक्रारी नंतर देखील चौकशी 'गुलदस्त्यात अन् मुद्देमाल भ्रष्ट बेईमानांच्या बस्त्यात' असाच प्रकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे मालमत्ता पाणीपट्टी वसुली विभागात घोटाळा,स्वच्छता व आरोग्य विभागात घोटाळा,बांधकाम विभागात तर महाघोटाळा,आस्थापणा विभागात तर घोटाळ्यांवर घोटाळे नौकर भरती घोटाळा,बोगस बिलांचा घोटाळा,लाखो रुपयांचा भंगार घोटाळा,इलेक्ट्रिक विभागात घोटाळा पाणीपुरवठा विभागात घोटाळा,पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी घोटाळा,माता रमाई घरकूल योजनेत देखील घोटाळा,स्वच्छ भारत अभियान योजनेत घोटाळा,घन कचरा प्रकल्प योजनेत घोटाळा,स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२० मध्ये घोटाळा,नगर परिषद प्रशासनाची मालमत्ता असलेल्या शहरातील असंख्य व्यवसायिक गाळ्यांचा देखील महाघोटाळा एकंदर नगर परिषदेत घोटाळेबाजांचे एकछत्री साम्राज्य निर्माण झाल्यामुळे एक घोटाळेबाज दुसऱ्या घोटाळेबाजाच्या घोटाळ्यावर सोईस्कररित्या पांघरून टाकतांना निदर्शनास येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या