💥या मेळाव्यास जिल्हा संपर्क प्रमुख राजेश साप्ते यांची प्रमुख उपस्थिती💥
परभणी : शिवसंपर्क अभियान निमित्त परभणी विधानसभा मतदार संघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, दलित आघाडी, शिक्षक सेना व सर्व संलग्न आघाड्याच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भव्य जाहीर सभा उद्या शनिवार, दि.०४ जून रोजी सायंकाळी ०६ वाजता श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालय, वसमतरोड येथे आयोजित करण्यात आली आहे़ या मेळाव्यास जिल्हा संपर्क प्रमुख राजेश साप्ते, खा़.संजय जाधव, आ़.डॉ़राहूल पाटील, जिल्हा प्रमुख विशाल कदम, सहसंपर्क प्रमुख डॉ़विवेक नावंदर आदी मान्यवर महत्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत़
महाराष्ट्रात सध्या सर्वत्र शिव संपर्क अभियानातंर्गत गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक तयार करून संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना वाढवण्यासाठी अभियान सुरू आहे़ तसेच मुख्यमंत्री श्री़उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आघाडी सरकारची मागील अडीच वर्षातील विकासाभिमुख कामे सामान्य नागरीकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच सरकारी योजनांचा लाभ तळागाळातील जनतेस मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शिव संपर्क अभियान राबवण्यात येत आहे़
या मेळाव्यास परभणी विधानसभा मतदार संघातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, दलित आघाडी, शिक्षक सेना व सर्व संलग्न आघाड्याच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन आ़डॉ़राहूल पाटील यांनी केले आहे़
0 टिप्पण्या