💥परभणी जिल्ह्यातील सेलू परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस...!

💥रवळगाव येथे शेतात लिंबाच्या झाडाखाली बांधलेला बैल विज कोसळुन ठार💥 

सेलू प्रतिनिधी :  

परभणी : जिल्ह्यातील सेलू शहरासह परिसरात शुक्रवार दि.१० जुन २०२२ रोजी दुपारी ०१-४५ ते ०३-०० वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह  पाऊस झाला. रवळगाव येथे शेतात लिंबाच्या झाडाखाली बांधलेला बैल विज कोसळुन ठार झाला सेलू शहर व परिसरात शूक्रवारी दुपारपासून वातावरण पूर्णतः बदलल्या नंतर पावणे तीनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्या. 

यावेळी तालुक्यातील रवळगाव येथील शेतकरी राम निवृत्ती रोडगे यांच्या शेतात लिंबाच्या झाडावर वीज कोसळली त्यात लिंबाच्या झाडाखाली दुपारी बांधलेले  तिन बैल पैकी एक बैल जागीच ठार झाला. सुदैवाने त्यांचा सालगडी दत्ता नामदेव फुलपागारे चहा पिण्यासाठी बाजूला गेल्याने वाचला

या वर्षातील पावसाच्या प्रथम आगमनाने शहराची विज मात्र गूल झाली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या