💥रयत बहुऊद्येशिय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य ऊपक्रम विविध शासकिय योजनाचा लाभ देवुन केला एकल महिलांचा सन्मान...!


💥या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार श्रीमती पल्लवी टेमकर यांची प्रामुख्याने उपस्थिती 💥

पुर्णा : कोरोना पुनर्वसन समिती व वात्सल्य समितीपुर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने पुर्णा तालुक्यातील कोरोना मधे विधवा/एकल महिलांना विविध विषयावर वेळोवेळी समुपदेशन करुन विधवा दिनानिमित्त विविध शासकिस योजनाचा लाभ देवुन सन्मान करण्यात आला.


  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार श्रीमती पल्लवी टेमकर व ईतर विभागाचे प्रतिनीधी ऊपस्थीत होते व प्रत्येक विभागाकडुन प्रत्यक्ष योजना वितरीत करण्यात आल्या यामधे सामाजिक सुरक्ष् योजनेचा एकुन दहा महिलांना लाभ देण्यात आला,व कृषी  विभागाकडुन महिलांना प्रत्यक्ष बियाने वाटप करण्यात आले पशुसंवर्धन विभागाकडुन मकबियाने व पशुची तपासणी करण्यात आली.पंचायत समितीविभागाकडुन पाच महिलांचे प्रस्ताव मंजुर करुन कामाचे आदेश काढले या बरोबरच रयत बहुऊद्येशियसेवाभावी संस्थेच्या वतीने कौशल्यविकास योजनेची सविस्तर माहिती सांगितली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या