💥वाशिम शहर येथे शस्त्र अधिनियमांन्वये कारवाई ; जिल्ह्यात आठवड्यात ०६ कारवायांमध्ये ०६ तलवारी जप्त....!


💥शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात विनापरवाना घातक धारदार शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात कारवाई💥

फुलचंद भगत

वाशिम :- समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे.

 काही असामाजिक घटक समाजाची शांतता भंग करण्यासाठी व जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्रांचा वापर करतात. त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करण्यात येते.या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली आज पो.स्टे. वाशिम शहर अंतर्गत सिव्हील लाईन्स येथे विनापरवाना घातक धारदार शस्त्र बाळगत समाजा मध्ये धाक,दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ सहकलम १३५ म.पो.का. अन्वये कारवाई करण्यात आली.पो.स्टे. वाशिम शहर हद्दीतील सिव्हील लाईन्स येथे एक ३५ वर्षीय इसम विनापरवाना धारदार तलवार बाळगून आहे. 

अशा गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष सदर आरोपीच्या घराची झडती घेतली असता आरोपीच्या घरातून एक लोखंडी धातूची तलवार व एक लोखंडी धातूचा खंजर अशी ०२ घातक धारदार हत्यारे मिळून आली. सदर इसमाजवळ शस्त्र बाळगण्याचा कुठलाही परवाना नसतांना घातक धारदार शस्त्र मिळून आल्याने सदर युवकावर पो.स्टे. वाशिम शहर येथे कलम ४, २५ शस्त्र अधिनियम सहकलम १३५ म.पो.का. अन्वये कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरातील शस्त्र अधिनियमांन्वये करण्यात आलेली हि सहावी कारवाई असून त्यामध्ये एकूण ०६ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. वर्षभरात पो.स्टे. रिसोड येथे ०४, पो.स्टे. अनसिंग येथे ०१, पो.स्टे. मानोरा येथे ०२, पो.स्टे. वाशिम शहर येथे ०४, पो.स्टे. कारंजा शहर येथे ०२ कारवाया अशा एकूण १३ कारवाया शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाया करण्यात आल्या आहेत.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्या पथकातील पोहवा. सुनिल पवार, पोना. प्रशांत राजगुरू,पोना.राजेश राठोड, पोकॉ. संतोष शेनकुडे यांनी पार पाडली. नागरिकांनी अश्याप्रकारे विनापरवाना शस्त्र बाळगीत समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू पाहणाऱ्या इसमांविरुद्ध न घाबरता समोर येऊन तक्रार देण्याचे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या