💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रयत्नांना यश दहा वर्षानंतर कृषी नगर येथील नाल्यावर महानगर पालिकाने टाकले पाईप....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने  यांचे कौतुकास्पद कार्य💥

परभणी : शहरातील कृषी नगर हे मागील सतरा अठरा वर्षापूर्वी वसलेली कॉलनी असून कॉलनीतील नागरिक नागरी सुविधांपासून वंचित आहेत. काही दिवसापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा कृषी नगर येथे झाल्यानंतर तेथील नागरीकांनी कृषी नगर कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नाल्यावर पाईप नसल्याने नागरीकांना येण्या - जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते व पावसाळ्यामध्ये नाला ओलांडणे अवघड व धोकादायक असल्याने परिसरातील लोकांना घरा बाहेर निघणे कठीण असते या प्रकरणी कृषी नगर येथे नागरीकांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करून संबंधीत महानगर पालिकेच्या नाल्यांवर पाईप टाकून रहदारीसाठी हा रस्ता मोकळा करून देणे बाबत विनंती केली होती.

 या तक्रारी दखल घेत प्रहार जनशकी पक्षाच्यावतीने परभणी शहर महानगर पालिकेच्या आयुक्तांची भेट घेवून संबंधीत काम तात्काळ करून देणे बाबत विनंती केली होती. शिवाय काम तात्काळ पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा ईशारा दिला होता. प्रहार जनशक्ती पक्षाच्या निवेदनाची दखल घेत आठ दिवसामध्येच म्हणजेच काल दिनांक २९ जून २०२२ रोजी परभणी शहर महानगर पालिकेच्या वतीने त्या नाल्यावर चार सिमेंटचे पाईप टाकून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्याचे मजबुतीकरण लकरच महानगर पालिकेच्या वतीने करण्यात येईल असे महानगर पालिकेच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षास आश्वासन देण्यात आले.

 नाल्यांवर पाईप टाकून रस्ता केल्याने संबंधीत परिसरातील नागरीकांचा मोठा प्रश्न प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. या बद्दल परिसरातील नागरीकांनी मा. ना. बच्चुभाउ कडू व प्रहार जनशक्ती पक्ष परभणीचे आभार मानले आहेत.या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, शहर प्रमुख धर्मेंद्र तुपसमिंद्रे महिला आघाडी शहर प्रमुख आरतीताई जुंबडे, शहर चिटणीस वैभव संघई या पदाधिकाऱ्यांसह वैजनाथ जाधव, रमेश काळे, ज्ञानेश्वर गिराम, सुदाम मस्के, रामेश्वर गिराम , पंढरीनाथ जाधव , रवि सोनाळे, महेंद्र तुपसमिंद्रे इ. नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या