🏵️पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथे नवागतांचा स्वागत सोहळा संपन्न...!


💥यावेळी सर्व प्रथम गावातील मुख्य रस्त्याने ढोलाच्या वाद्यासह शैक्षणिक प्रभात फेरी काढण्यात आली💥


पुर्णा (दि.१५ जुन २०२२) तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज बुधवार दि.१५ जुन २०२२ रोजी नविन शैक्षणिक सत्र सुरुवातीला पंचायत समिती सभापती अशोकराव बोकारे,गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर,विषयतज्ञ व्यंकटरमन जाधव सर,पोलिस पाटिल ग्यानोबा बोकारे,शाखा व्यवस्थापण समिती अध्यक्ष गंगाधर बोकारे,सदस्य रघुनाथ बोकारे, नामदेव बोकारे,त्र्यंबकराव बोकारे,मुंजाभाऊ बोकारे, लक्ष्मण बोकारे, अंकुश बोकारे, गणेश बोकारे, बापूराव बोकारे, ज्ञानदेव बोकारे,मुख्याध्यापक गोविंद नलबलवार सर, भागवत शिंदे सर, विलास बोकारे सर, गणेश कुऱ्हे सर, आबनराव पारवे सर, श्रीमती योगिता कुलकर्णी  मॅडम व गावकरी मंडळींची उपस्थिती होती.


सर्व प्रथम गावातील मुख्य रस्त्याने ढोलाच्या वाद्यासह शैक्षणिक प्रभात फेरी काढण्यात आली.सर्व परिसर विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.सर्व विद्यार्थी आनंदाने प्रभात फेरीत सहभागी झाले होते.त्यानंतर पं.स.सभापती श्री अशोकराव बोकारे साहेब,गटशिक्षणाधिकारी श्री बालाजी कापसीकर साहेब व उपस्थित सर्वांच्या हस्ते नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तके वाटप सोहळा संपन्न झाला.

पंचायत समिती सभापती अशोकराव बोकारे व गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर यांनी शाळेतील उपक्रम जसे की-परीक्षेचा शनिवार,उन्हाळी अभ्यास,इंग्रजीचे 20 शब्दांपासून 625 वाक्य बनविणे,वाचन उपक्रम इत्यादी, शालेय परिसर व शाळेतील गुणवत्ता पाहुन समाधान व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबनराव पारवे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन भागवत शिंदे सर यांनी केले एकंदरीत कार्यक्रम छान प्रकारे संपन्न झाला...


  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या