💥परभणी येथील कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयतील प्रा.पल्लवी कुलकर्णी यांना पीएचडी प्रदान...!


💥त्यांनी हिंदी सिने संगीतामध्ये शास्त्रीय संगीताचे योगदान एक चिकित्सक अभ्यास कालखंड या विषयावर प्रबंध सादर केला💥

परभणी :  येथील कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील संगीत विभागात कार्यरत असलेल्या प्रा.पल्लवी प्रभूराज कुलकर्णी जवळेकर यांनी डॉ राजेंद्र देशमुख यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी सिने संगीतामध्ये शास्त्रीय संगीताचे योगदान एक चिकित्सक अभ्यास कालखंड १९४० ते १९६०.या विषयावर प्रबंध सादर केला.त्यास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ने मान्यता दिली. सदर समीतीत स्वा.रा.ती.म.विद्यापीठ नांदेडचे ललित कला आणि प्रयोगजीवी संकुलाच्या अधिष्ठाता प्रा.डॉ.वैजयंता पाटील, भाषा संकुलाच्या संचालक प्रा.डॉ.शैलजा वाडीकर ,बहिःस्थ परिक्षक प्रा.डॉ.राजीव बोरकर संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, मार्गदर्शक प्रा.डॉ.राजेंद्र देशमुख, यांच्या समीतीने विद्यापीठाला शिफारस केली. प्रा.डॉ.पल्लवी कुलकर्णी यांना पी.एचडी. प्रदान पदवी प्रदान करण्यात आली.

 पी.एचडी.पदवी संपादन केल्याबद्दल नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर, उपाध्यक्ष ॲड.किरणराव सुभेदार, कोषाध्यक्ष  डॉ.अभयराव सुभेदार, सचिव विजयराव जामकर , सहसचिव डॉ संजयराव टाकळकर,सर्व संचालक, प्राचार्य डॉ वसंतराव भोसले, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या