💥रिसोड येथे प्लास्टिक बंदी अंतर्गत 12 हजार रुपयांची दंड वसूली...!


💥या प्रकारानंतर दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे💥

फुलचंद भगत

वाशिम :- रिसोड येथे प्लॅस्टिक बंदी मोहिमेंतर्गत स्थानिक परिषदेने विविध दुकानांवर टाकलेल्या छापेमारीनंतर काही दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले, त्यांच्याकडून प्लास्टिक बंदी निर्मूलन कायद्यान्वये दंड वसूल करण्यात आला.  

या प्रकारानंतर दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे रिसोड शहरात प्लास्टिक बंदीच्या तक्रारी वाढत होत्या.  प्लॅस्टिकचा वापर बेधडकपणे वाढत असल्याची.बाब लक्षात घेत मुख्याधिकारी नीलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक अब्दुल अजीज़, माणिक भागवत, अरुण भवाने, संदीप सारस्कर, प्रफुल्ल काळे, विजय नाईक, बाळकृष्ण देशमुख, मनोज पंडित, दगडू थोरवे यांच्या चमुने बालाजी जनरल स्टोअर्समधून 2 हजार, संतोष हमाने यांचेकडून 10 हजार असा मोहिमेदरम्यान एकूण ₹ 12 हजार दंड वसूल करण्यात आला.  ही कारवाई सातत्याने सुरूच राहणार असल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या