💥हिंगोली येथे म.ज्योतीबा फूलेवर आधारीत 'तृतीय रत्न' ह्या नाटकाचा दि.१९ मे रोजी महाप्रयोग.....!


💥मोफत नाटक पाहन्यासाठी जास्तीतजास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ नागोराव जांबूतकर यांनी केले💥

शिवशंकर निरगुडे :- हिंगोली 

हिंगोली (दि.१७ मे २०२२) - येथील शिवाजी सभागृह रामलीला मैंदाना जवळ गुरूवार दि.१९ मे २०२२ रोजी सायंकाळी ७-०० वाजता महात्मा जोतीराव फुले यांच्यावर आधारीत " तृतीय रत्न" शिक्षन हा मानसाचा तीसरा डोळा आधारीत हे नाटक महात्मा जोतीराव फुले संशोधन व प्रशिक्षन संस्था (महाज्योती) नागपूर महाराष्ट्र शासनाच्या ईतर मागास बहूजन कल्यान विभागाची स्वायत संस्था यांच्या वतीने हा नाट्य प्रयोग होत आहे.

 महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन पटावर आधारीत हे नाट्य आहे शिक्षनाचे महत्व, शेतकर्याचे होनारे हाल,गोरगरीबावर होनारे अत्याचार,बहूजनाना आपल्या हकापासून दूर ठेवनारे व त्यांच्यावर केलेले जूलूम ,सावित्रीबाई वर झालेले अन्याय ,व ईतर सर्व कहानी या नाटकातून मांडलेली आहे त्या करीता सर्व नागरीकानी, गोरगरीबानी ,सर्व बहूजनानी सर्व कर्मचारी वर्गानी या मोफत नाटकाचा नाट्यप्रयोग पहान्यासाठी लाभ घ्यावा व सहकार्य करावे आसे आवाहन अखील भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जील्हा अध्यक्ष डॉ नागोराव जांबूतकर व कार्याध्यक्ष चंदूभाऊ लव्हाळे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या