💥पुर्णा शहरातील प्रतेक वार्डात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा स्थापण करणार शहराध्यक्ष राज ठाकर यांचा निर्धार...!

💥शहरातील अमृतनगरात मनसे शाखेच्या फलकाचे मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख यांच्या हस्ते उदघाटन संपन्न💥


पूर्णा (दि.२० मे २०२२) - शहरातील प्रत्येक वार्डात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखांची स्थापणा करण्याचा दृढा निर्धार मनसेचे शहराध्यक्ष गोविंद उर्फ राज ठाकर यांनी केला असून त्याच अनुषंगाने आज शुक्रवार दि.२० मे २०२२ रोजी शहरातील अम्रुतनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा फलकाचा उदघाटन सोहळा मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के (देशमुख) यांच्या हस्ते पार पडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मनसेचे पुर्णा तालुकाध्यक्ष अनिल बुचाले यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी अमृत नगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखाध्यक्ष  शशीकांत सूर्यवंशी तर उपाध्यक्षपदी भारत बोबडे,सचिव पदावर सोनु ठाकूर, कोषाध्यक्ष पदावर मनोज काशिकर,तर सदस्य म्हणून स्वप्निल पांचाळ,भारत कऱ्हाळे,राज कुऱ्हे,शेख जावेद आदींची निवड करण्यात आली असून या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आयोजन शहर अध्यक्ष गोविंद (राज) ठाकर यांनी केले होते याप्रसंगी शहर उपाध्यक्ष पंकज राठोड,शहर उपाध्यक्ष राजेश यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी- महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या