💥मुंबई भायंदर येथील सफाई कामगार कृष्णा तुसामड हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा...!


💥पुर्णेचे तहसिलदार यांच्या मार्फत निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी💥 

मुंबई भायंदर येथे बेंटेस दागिने बनिवनारी खाजगी कंपनी मध्ये सफाई काम करणारा कृष्णा तुसामड ह्या वक्तीची दि.७ मे २०२२ रोजी चोरी केल्याच्या संशयावरून त्याचे हातपाय बांधून लाठ्या, काठ्या, बॅट आणी राॅड ने मारहाण केली त्याला ऐवढे मारले कि त्याचा जाग्यावरच मृत्यू झाल्यानंतर त्याला कंपनी व्हॅन मध्ये घरी सोडले छतावरून पडुन याचा मृत्यू झाला असे आई वडिलांना सांगून तेथुन निघुन गेले कुटुंबाने खाजगी रुग्णालयात दाखल केल्या नंतर डॉक्टरांनी त्यांला मृत घोषित केले सदरिल घटना हि पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी असुन त्यांची शासनाने दखल घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी कुटुंबाला आर्थिक मदत करून त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे तहसीलदार पुर्णा यांच्या मार्फत निवेदन दिले सुमित चावरे वाल्मीकी आर्मी अध्यक्ष यांनी केली आहे. मनोजकुमार सौदा (जि अध्यक्ष परभणी वाल्मिकी आर्मी), विजयकुमार सौदा (जि अध्यक्ष परभणी अभावामहासभा) अजय चावरीया,सुरज घारू,शाम बोहत, सुनिल गायकवाड, आकाश गायकवाड उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या