💥पुर्णेत राजपुत क्षत्रीय समाज बांधवांकडून हिंदुकुलभुषन राष्ट्रविर महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी....!


💥यावेळी महाराणा प्रतापसिंह चौकात राष्ट्रविर महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले💥


पुर्णा : शहरात काल सोमवार दि.०९ मे २०२२ रोजी शहरातील राजपुत क्षञीय समाजासह सर्व हिंदु समाज बांधवांकडून हिंदुकुलभुषन राष्ट्रविर महाराणा प्रतापसिंहजी यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शहरातील महाराणा प्रतापसिंहजी चौक येथील नियोजीत महाराणा प्रतापसिंहजी पुतळा स्थळावरील महाराणा प्रतापसिंहजी यांच्या प्रतिमेस शिवसेना नगरसेवक ॲड.राजेश भालेराव व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ बाळू कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड,डॉ.अजय ठाकूर,मा.शहरप्रमुख नितीन उर्फ बंटी कदम,खुजडा ग्रामपंचायचे सरपंच नंदकुमार भालेराव,विजय कराड,नरेंद्र उर्फ मुन्ना राठोड रेल्वे कामगार नेते कांचनसिंह ठाकुर,सुरेंद्रसिंह ठाकुर आदीं मोठ्या संख्येने उपस्थित  राजपुत युवा मंचच्या सन्माननीय सदस्य समाजबांधवांनी हिंदुकुलभुषन राष्ट्रविर महाराणा प्रतापसिंहजी यांनी विनंम्र अभिवादन केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या