💥विजय कुलकर्णी यांना 'चौथा स्तंभ' चा राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार जाहीर....!

 


💥गेल्या १५ वर्षाच्या पत्रकारितेच्या वाटचालीत विजय कुलकर्णी यांनी अनेक वर्तमान पत्रात जनहीतवादी पत्रकारीता केली आहे💥

परभणी/प्रतिनिधी

‘अप्रतिम मिडिया’ च्या वतीने बीट जर्नालिझमसाठी दिला जाणारा ‘चौथास्तंभ विशेष पत्रकारीता राज्यस्तरीय पुरस्कार २०२२’ साठी शैक्षणिक वृत्त गटातील पुरस्कार येथील दै. लोकनेताचे संपादक विजय कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. २०२०-२१ या दोन वर्षामध्ये केलेले विशेष वृत्तांकन, विश्लेषण व पुरस्कार निवड प्रक्रीयेचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे एखाद्या विषयाची केलेले मांडणी आदी निकष या पुरस्कारासाठी लावण्यात आले होते.

गेल्या १५ वर्षाच्या पत्रकारितेच्या वाटचालीत विजय कुलकर्णी यांनी दै. देवगिरी तरूण भारत, दै. सोलापुर तरूण भारत, गावकरी, आनंद नगरी, लोकमत ते दै. लोकनेता अशा विविध वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात घडणारे नाविन्यपूर्ण बदल तसेच सकारात्मक पद्धतीचे विषय त्यांनी सातत्याने मांडले आहेत. त्यांना ज्येष्ठ संपादक डॉ. अनिल फळे, दिलीप धारुरकर, सुधीर महाजन, दिनेश हारे आदींचे मार्गदर्शन पत्रकारीतेत लाभले आहे. या ‘चौथास्तंभ विशेष पत्रकारीता राज्यस्तरीय पुरस्कार २०२२’ साठी संपूर्ण राज्यातून विविध माध्यम प्रकारांच्या प्रतिनिधींनी नामांकन केले होते. २०२०-२१ या दोन वर्षांमध्ये संबंधीत पत्रकारांनी केलेले विशेष वृत्तांकन व वेब संवादाद्वारे एखाद्या समस्येची केलेली मांडणी हे विषय महत्वाचे ठरले. दरम्यान, राजकारण ते पर्यावरण वृत्तगटातून प्रथम, द्वितीय, तृतिय व उत्तेजनार्थ अशा श्रेणीचे पुरस्कार घोषित करण्यात आले असल्याची माहिती अप्रतिम मिडीयाचे संचालक डॉ. अनिल फळे, संचालिका प्रीतम फळे, निमंत्रक राहुल शिंघवी, रणजीत कक्कड, मानस ठाकूर, जगदीश माने, निशांत फळे यांनी दिली. नामांकन केलेल्या पत्रकारास नामांकन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पुरस्कार विजेत्यांना मुंबई येथे लवकरच होणार्‍या भव्य वितरण समारंभात सन्मानीत करण्यात येणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या