💥नाशिक येथील भद्रकाली पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस नाईकाला लाच घेताना अटक...!


💥लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० हजारांची लाच घेताना लाचखोरांना मुद्देमालासह अटक केली💥

नाशिक : भद्रकाली पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रणिता पवार आणि पोलिस नाईक तुषार बैरागी यांना  सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० हजारांची लाच  घेताना मुद्देमालासह अटक केली.

याबाबत रात्री उशिरापर्यंत भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दोन ते तीन महिन्यांपूर्वी तक्रारदाराविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होता. त्याचा तपास प्रणिता पवार करीत होत्या. गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासह मे.न्यायालयात लवकरात लवकर दोषापत्र दाखल करण्यासंदर्भात प्रणिता पवार यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती.

 याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी केली. त्यावरून तिवंदा पोलिस चौकीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैशाली पाटील, राजेंद्र गिते,शरद हेंबाडे, अजय गरुड,प्रकाश महाजन, परशुराम जाधव यांनी सापळा रचून प्रणिता पवार आणि पोलिस नाईक तुषार बैरागी यांना २० हजारांची लाच घेताना अटक केली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने,अप्पर अधीक्षक नारायण हळदे उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

दरम्यान आडगाव पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली होती या घटनेस २४ तास उलटत नाही तोच भद्रकाली पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या