💥युवकांनी आपल्या स्वप्नांच्या मागे धावून योजनांचा आधार घेत स्वप्नपुर्ती करुन समाजासह देशाला पुढे घेवून गेले पाहीजे...!


 💥राज्याचे पर्यटन मंत्री तथा युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन💥 

परभणी (दि.१० मे २०२२) : सर्व समाज घटकांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबविण्यात असते. युवकांनी आपल्या स्वप्नांच्या मागे धावून योजनांचा आधार घेत स्वप्नपुर्ती करुन समाजासह देशाला पुढे घेवून गेले पाहीजे. दिव्यांगाचा हा आगळावेगळा सर्वधर्मीय विवाह सोहळा निश्चितच प्रेरणादायी असून मानवतेची सेवा करणे हाच आपला खरा धर्म असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.


आमदार डॉ. राहूल पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय दिव्यांगाचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा नुतन विद्यामंदीर मैदान परिसरात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री धनंजय मुंडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, खासदार हेमंत पाटील, आमदार डॉ. राहुल पाटील, ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्यासह सर्वधर्मीय धर्मगुरुची प्रमुख उपस्थिती होती.

पर्यटन मंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, समाजकारण हे महत्वाचे आहे.  परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सदैव कटीबध्द असून वेगवेगळ्या माध्यमातून आणि इतर सर्व शासकीय विभागांच्या सहकार्यातून निश्चितच येणाऱ्या काळात चांगली कामे केली जातील अशी ग्वाही देवून त्यांनी सर्वधर्मीय ३१ जोडप्यांच्या विवाहाचे नियोजन करणे हे काही सोपे काम नसून त्यांना एकत्र आणून पुढे घेवून जाण्याची जबाबदारी घेणारे आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या कार्याचे  कौतूकही केले.

यावेळी पालकमंत्री श्री.मुंडे म्हणाले की, सामुदायिक विवाह सोहळे भरपुर पाहिले असून दिव्यांगांचा राज्यस्तरीय विवाह सोहळा आज  प्रथमच पाहत आहे. या दिव्यांगाच्या विवाह सोहळ्यातून आपली परभणी जगभरात गेली आहे यांचा आनंद व समाधान वाटते. विशेष सहाय्य विभागात दिव्यांगाचा विषय येत असून आंतरजातीय विवाह झाल्यास प्रोत्साहनपर  रक्कम दिली जाते त्याच धर्तीवर दिव्यांगानी सामुदायिक विवाह सोहळ्या लग्न केले असेल तर त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना लवकरच  आखली जाईल अशी नि:संदिग्ध ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच येणाऱ्या 8 तारखेला जिल्ह्यातील एक हजार कर्णबधिरांना जिल्हा नियोजन समिती व यशवंतराव प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रवणयंत्रे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी गेल्या दोन वर्षापासून शासनाकडून अतिशय उत्कृष्ट कामे करण्यात येत असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासनाची यशस्वीपणे घौडदौड सुरु असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक आमदार डॉ. राहूल पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, नवदाम्पत्याचे नातेवाईक, पत्रकार आदी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या