💥ना.धनंजय मुंडे यांनी दिलेल्या जबाबदारीचे केले सार्थक💥
शिवाजीराव बन्सीधर अण्णा सिरसाट हे ग्रामीण भागातून आलेले युवा नेतृत्व... समाजसेवेचे आणि जनसामान्यांसाठी काम करण्याचे बाळकडू त्यांचे वडील आणि जेष्ठ नेते बन्सीधर अण्णा सिरसाट यांच्याकडूनच मिळालेले. अगदी बालपणापासून सार्वजनिक जीवन जवळुन बघितल्याने राजकारणाचे धडे घेण्याची त्यांना गरजच भासली नाही. माशाच्या पिलाला पोहणे शिकवण्याची गरज नसते त्याप्रमाणेच शिवाजीराव सिरसाट यांना समाजसेवा शिकवण्याची गरज पडली नाही.
शिवाजीराव सिरसाट यांनी अगदी आपल्या शालेय जिवनापासुनच सामाजिक कार्य सुरू केले. वडील बन्सीधर अण्णा सिरसाट यांचा राजकारणात चांगलाच दबदबा असल्याने गावातीलच नव्हे तर परिसरातील नागरिक लहान मोठ्या कामासाठी त्यांच्याकडे येत असत. अगदी तळागाळातील माणसाच्याही कामाला ते कधी नाही म्हणत नसत. हाच वारसा घेऊन शिवाजीराव सिरसाट यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली. शिवाजी सिरसाट मितभाषी असले तरी प्रत्येकाची अडचण समजून घेऊन त्याला मदत करण्याची त्यांची हातोटी. त्यामुळे त्यांच्याकडे आलेला माणूस नाराज होऊन गेला असे कधी झाले नाही.
फक्त गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील कुणाचीही अडचण असो काळ वेळ न पाहता मदतीला धावून येणारा माणूस म्हणजे शिवाजीराव सिरसाट अशी परिसरात ओळख. घाटनांदुर या तालुक्यासमान समान गावात शेतकरी, शेतमजूर आणि नागरीकांशी त्यांचा थेट नाळ जोडली असल्याने, कुणाला पैसे कमी पडले, कुणाला दवाखान्यात मदतीची गरज वाटली तर लोक हक्काने त्यांच्याकडे येणारच... आणि शिवाजी सिरसाटही त्यांना मदत करणारच हे गणित ठरलेलेच....
शिवाजीराव सिरसाट यांच्या लोकांमध्ये मिसळून काम करण्याच्या वृत्तीमुळेच ते तब्बल चार वेळा गावचे बिनविरोध सरपंच झाले. सरपंच असताना त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी शिवाजीराव सिरसाट यांच्या पत्नी सौ.शिवकन्या सिरसाट यांना अगोदर जिल्हा परिषदेचे तिकीट दिले आणि कार्याची क्षमता पाहुन जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. यामुळे सिरसाट दांपत्याच्या कार्याला खरी गती मिळाली. दोघांनी मिळून जिल्ह्याच्या अगदी वाडी तांड्यावर विकास गंगा पोंहचविली. शिवाजीराव सिरसाट यांनी धनंजय मुंडे यांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी शिवाजीराव यांनी जिवाचे रान केले आणि आपल्या कामाची छाप पाडली. शिवाजीराव सिरसाट हे ग्रामीण भागातून आलेले आणि आपल्या कामाने वेगळी ओळख निर्माण केलेले नेतृत्व आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ईश्वर चरणी प्रार्थना....
महेश सिरसाट
0 टिप्पण्या