💥विरशैव लिंगायत प्रतिष्ठाण आयोजित महात्मा बसवेश्वर जयंती अभिवादन...!


💥या कार्यक्रमास खा.संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार💥

परभणी (दि.03 मे) - येथीलछत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथे दि.03 रोजी 2022 रोजी सकाळी 8:00 वाजता वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष डॉ. मदन लांडगे यांच्या नेतृत्वाखाली,प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थित जगदगुरु एकोरामाराध्या जयंती व  महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पुजन करत जयंती  साजरी होणार आहे.

या कार्यक्रमास खा.संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून परभणी जिल्ह्यातील सर्व वीरशैव लिंगायत बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन  वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण चे सोमेश्वर लाहोरकर, महेश स्वामी, डॉ. गोविंद कामटे, मधुकर स्वामी, सदानंद उबाळे , शिवाजी वाकोडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या