💥वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : जबरी चोरीच्या गुन्ह्याचा ३६ तासाच्या आत लावला तपास.....!


💥जबरी चोरीच्या घटनेतील ४ आरोपींसह ७.५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात💥

वाशिम (दि.०७ मे २०२२) :-दिनांक ०३/०५/२०२२ रोजी पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे फिर्यादी चंद्रकांत शौकीराम जिवनानी वय वर्षे ५५ धंदा व्यापार रा अल्लाडा प्लॉट वाशिम यांनी फिर्याद दिली की, फिर्यादी यांचे दुकानातील गल्ल्याील २ लाख रु.व बिडी कलेक्शनचे १५ लाख रु दोन थैलीत १७ लाख रु घेउन स्कुटीवर घरी परत जात असताना अनोळखी इसमानी त्यांचे गाडीला धक्का देऊन खाली पाडले व फिर्यादी यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादी यांचे जवळील १७ लाख रुपये असलेली थैली घेऊन निघुन गेले अशा फिर्यादी वरुन पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे अपक्र ३५५/२२ कलम ३९४,३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर गुन्हयातील आरोपीचा शोधाशोध चालु असतांना मिळालेल्या गोपनीय माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखेतील वेगवेगळी पथके तयार करून

वाशिम शहर परिसरात शोध घेत असताना १) अनुपम मदन चिंचाबेकर वय २३ वर्षे रा एसएमसी मागे लाखाळा वाशिम यास ताब्यात घेऊन विचारपुर गेली असता त्याने त्यांचे तिन साथीदारा सह वाशिम येथे येवुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याच प्रमाणे आरोपीचे सांगण्यावरून त्यांचे साथीदार नामे २) बादशाह उर्फ अजय

शिवराम राउत वय २१ वर्षे रा काकडदाती ता जि वाशिम ३) अरुण भारत खडसे वय २३ वर्षे रा जांभरुण नावजी,ता जि वाशिम ४) आकाश आत्माराम चोपडे वय २२ वर्षे रा येवता ता रिसोड हमु काळे फाईल वाशिम यांना अटक करण्यात आले. नमुद आरोपीतांकडुन ६,५०,०००/- नगदी व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल किंमत ७०,०००/- ४ मोबाईल ३५०००/-असा एकुण ७,५५,०००/- चा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपीतांना पोस्टे वाशिम शहर यांच्या ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पोस्टे वाशिम शहर येथील तपास अधिकारी सपोनि दानडे करीत आहे. नमुद आरोपीतांचा गुन्हे अभिलेख पडताळला असता त्यांचे नावे हयापुर्वी गुन्हेनोंद असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच त्यांचेवर आणखी काही गुन्हे वाशिम जिल्हयात किंवा इतर जिल्हयात दाखल आहेत का यांची खात्री करुन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चनसिंह साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री.भामरे साहेब, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक,श्री सोमनाथ जाधव,सपोनि अतुल मोहनकर,पोहेकॉ सुनिल पवार,

संतोष कंकाळ,पोना राजेश राठोड,अमोल इंगोले,प्रशांत राजगुरु,राजेश गिरी, प्रविण राउत, अश्विन जाधव,गजानन गोटे, पोकॉ निलेश इंगळे,डिगांबर मोरे,अविनाश वाढे,शुभम चौधरी सायबर सेल येथील पोकॉ प्रशांत चौधरी,गोपाल चौधरी यांनी केली आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या