💥तात्काळ रस्ताच्या बोगस कामाच दर्जा सुधारून काम दर्जेदार करा अन्यथा तीव्र आंदोलन💥
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी मतदारसंघातील परळी ते पानगाव मार्गे चांदापूर- अंबलटेक- घाटनांदूर - पिंप्री- फावडेवाडी या ३६ किमी लांबीच्या रस्त्याच्या काम बोगस होत असल्याची तक्रार चांदापूर येथील धनराज उमाजी गित्ते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तात्काळ रस्ताच्या बोगस कामाच दर्जा सुधारून काम दर्जेदार करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परळी मतदारसंघातील परळी ते पानगाव मार्गे चांदापूर- अंबलटेक- घाटनांदूर- पिंप्री- फावडेवाडी या ३६ किमी लांबीच्या रस्त्याच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजनाचे 6 फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हायाचे तत्कालीन पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर काम डीपीजे कन्स्ट्रक्शन प्रा.लि.पुणे या कपनीस काम देण्यात आले आहे. या रस्ताचे काम मोठ्या प्रमाणात बोगस होत आहे. रस्ताचे अंदाजपत्रकानुसार काम होत नाही. भराव हा मुरूमा ऐवजी दगडगोटे यांनी करत आहेत.रस्ताची लांबी रूंदी नियमानुसार नाही.लेंडेवाडी जवळील घाटातील काम व लवल योग्य होत नाही. या रस्त्यासाठी 86 कोटी रुपयांचा निधी मंजूर असताना देखील सदरील रस्त्याचे काम थातूरमातूर व बोगसगिरी मोठ्या प्रमाणात केले जात आहे. रस्त्याचे भूमीपूजन स्वतः पालकमंत्री यांनी केले व आपल्या भाषणात रस्ता दर्जेदार करण्याची तंबी देवूनही सदरील कंत्राटदार आपली मनमानी करत आहेत. नाहीं.सदरील कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याशी संगणमत करून निकृष्ठ व बोगस पद्धतीने काम करून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे.पालकमंत्र्यानी मतदार संघातील कामाकडे लक्ष देण्याची गरज असुन याबाबत चांदापूर येथील धनराज उमाजी गित्ते यांनी लेखी निवेदनाद्वारे संबंधित विभागाकडे तक्रार दिली आहे. या रस्त्याचे कामाची चौकशी कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केले आहे....
0 टिप्पण्या