💥नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाशी संबंधित मागण्यांसाठी येत्या सोमवार दि. 23 मे पासून साखळी उपोषण...!


💥जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार साखळी उपोषण💥 

नांदेड (दि.२१ मे २०२२) - गुरुद्वारा बोर्डाशी संबंधित विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हजुरी साथ-संगत तथा बाबा फत्तेसिंघजी बहुउद्देशीय  सेवाभावी संस्था नांदेड यांच्यावतीने  येत्या दि. 23 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

 यापूर्वीच्या भारतीय  जनता  पक्षाच्या सरकारने गुरुद्वारा बोर्ड अधिनियमाच्या कलम 11 मध्ये संशोधन करून, गुरुद्वारा बोर्डावर थेट शासनातर्फे अध्यक्ष निवडण्याचा जाचक निर्णय,येथील स्थानिक जनतेवर अक्षरशाः लादला. तेव्हापासून या कलमाच्या विरोधात अनेक आंदोलने झाली.मात्र तत्कालीन शासनाने याची जाणीवपूर्वक दखल घेतली नाही.आताच्या आघाडी शासनाकडेही याविषयी अनेक निवेदने देण्यात आली. मात्र अद्यापही येथील जनतेला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे कलम 11 मधील संशोधन त्वरित रद्द करावे,वर्तमान गुरुद्वारा बोर्डाचा कार्यकाळ आठ मार्च रोजी संपल्याने ते त्वरित प्रभावाने बरखास्त करण्यात यावे,बोर्डासाठी जनतेतून निवडून द्यावयाच्या तीन जागांऐवजी 11 जागांसाठी निवडणूक घेण्यात यावी, कार्यरत असलेल्या गुरुद्वारा बोर्डाच्या तीन वर्षाच्या कार्यकालात, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकार्‍यांच्या अधिपत्याखालील समितीमार्फत चौकशी करण्यात यावी. या चार मागण्यांसाठी येत्या 23 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. याविषयी एक निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना प्रेषित करण्यात आले आहे. या निवेदनावर बाबा फत्तेसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य स.मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी यांच्यासह स.बिरेंदरसिंघ नारायणसिंघ बेदी,स.जसपालसिंग ग्यानसिंघ लांगरी,स.बंदीछोडसिंघ रतनसिंघ खालसा,स.प्रेमजितसिंघ हरिसिंघ शिलेदार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या