💥परभणीत लोक अदालतीत 13 हजार 73 प्रकरणे निकाली ; 5 कोटी 93 लाखांची वसुली...!


💥सन्माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली लोक अदालत संपन्न💥 

परभणी : परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने दि.07 मे 2022 रोजी परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते या लोक अदालती मध्ये एकूण 13 हजार 73 प्रकरणे निकाली निघाली असून 5 कोटी 93 लाख 63 हजार 164 एवढ्या पैशांची वसुली करण्यात आली आहे.

       न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे 469 असून 41524513 रुपये वसुली करण्यात आली आहे. स्पेशल ड्राईव्ह - 284 प्रकरणे निकाली,  ग्रामपंचायत पाणी पट्टी व घरपट्टी - 7661 प्रकरणे निकाली  निघाले  असून  यामधून  15863151   रुपये  वसुल केले आहेत.  ई- ट्रॅफिक चालन - 4659 प्रकरणे   निकाली निघाली  असून 1975500 रुपये वसुली करण्यात आली आहे. याप्रमाणे राष्ट्रीय लोकदल अदालतीमध्ये एकूण 13 हजार 73 प्रकरणे निकाली निघाली असून यामधून 59363164  रुपये एवढी वसुली करण्यात आली आहे.

       सदरची राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एफ. के. शेख, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, पॅनल प्रमुख, पॅनल विधिज्ञ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.

       दरम्यान, सर्व प्रकारची तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणी पट्टी प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम 1881, बँकेतील प्रकरणे, मोटार अपघातांची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भु- संपादन प्रकरणे,  वीज प्रकरणे, पाणी व आकार प्रकरणे, वेतन व भत्ते यांची सेवा विषयक प्रकरणे, महसूल आणि दिवाणी स्वरूपाची प्रकरणे अशी अनेक प्रकरणे निकाली काढण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन द्वारे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

       राष्ट्रीय लोक अदालतीसाठी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ड गोपाल दोडिया, जिल्हा पुरोगामी वकील संघाचे ड बीटी पोळ, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. डी. यु. दराडे यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या