💥संत निरंकारी सत्संग भवनात रविवारला रक्तदान शिबिराचे आयोजन...!


💥२४ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन💥 

फुलचंद भगत

मंगरुळपीर:-निरंकारी बाबा गुरुबचन सिंह महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २४ एप्रिल रोजी संत निरंकारी चॅरिटेबल दिल्ली वतीने संपूर्ण देशात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केल्या जाते संत निरंकारी मंडळ शाखा वाशिम च्या वतीने सुद्धा २४ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन लाखाळा स्थित संत निरंकारी सत्संग भवन येथे सकाळी ९ पासून केले आहे.

या रक्तदान शिबिराचे उदघाटन अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे राहणार आहेत.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विजय काळबांडे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयदेव नवघरे,व्यापारी संघटनेचे मनीष मंत्री यांची उपस्थिती राहणार आहे.तरी या रक्तदान शिबिरास वाशिम शहर तथा परिसरातील सर्व युवक, पुरुष महिला व युवती यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक श्रीराम जाधव महाराज, दत्तात्रय बंडेवार,डॉ. चांदवानी, माणिक राठोड, जनार्दन बोरकर, सचिन सोनुने, सुनील बोरकर, प्रवीण जाधव, महादेवराव इंगोले, राजा रामवानी, संतोष खोडे, राजू हरचंदनी यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या