💥परभणीचे पोलिस अधीक्षक जयंत मिना यांनी स्थापन केलेल्या धक्का स्कॉड पोलिस पथकामुळे जयंती मिरवणूक सुरळीत...!


💥पूर्णेत प्रत्येक सणासुदीला मोठा पोलिस बंदोबस्त असतो राज्य राखीव बलासह  कर्मचाऱ्यांचा ताफा नेमण्यात येतो💥

पूर्णा (दि.१६ एप्रिल) परभणी पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी स्थापन केलेल्या धक्का स्कॉड पोलीस कर्मचारी पथकांमुळे पूर्णा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक सुरळीत पार पडली.

        पूर्णा शहरात मागील पाच वर्षापुर्वी १४ एप्रिल २०१७ रोजी भीम जयंती मिरवणुकीवर काही समाजकठकांनी  दगडफेक केली होती, त्यावेळी जातीय दंगल होऊन मोठे नुकसान झाले होते, अतिसंवेदनशील शहर असलेल्या पूर्णा शहरात प्रत्येक सणासुदीला मोठा पोलिस बंदोबस्त असतो राज्य राखीव बलासह  कर्मचाऱ्यांचा ताफा नेमण्यात येतो.


  २०१७ मधील घटना लक्षात घेता भीम जयंती मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी पूर्णा शहरातील रहिवासी असलेले परंतु जिल्हाभरात अन्य ठिकाणी भाऊ पाटील कार्यरत पोलिस कर्मचारी व अधिकारी यांना जयंती मिरवणुकी साठी पाचारण करण्यात येते.

      धक्का  स्कोड  पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे दुपारी एक वाजता निघालेली भीम जयंती मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ दिलेल्या वेळेत संपन्न झाली.

        या पथकामध्ये फौजदार रवी दीपक,शे.लतीफ,जमादार  युसुफ पठाण, राजेश्वर यसुरकर, गौतम ससाने, यशवंत वाघमारे,प्रशांत दीपक, प्रवीण दीपक,दीपक मुदीराज,नितीन कसबे,मधुकर पवार,पंकज म्हेत्रे, मिलिंद कांबळे, मिलिंद जोगदंड, बालकिशन बरकुंटे यांचा समावेश होता.

       सदर पथकाने पोलीस उपाधिक्षक ब्रह्मदेव गावंडे,पोलीस निरीक्षक सुभाष मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले, याशिवाय जयंती मंडळाचे पदाधिकारी विशेषता भदंत उपगुप्त महाथेरो,रिपाइं नेते प्रकाश कांबळे गटनेते उत्तम खंदारे, जयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

धक्का स्कोड पथक मागील पाच वर्षांपासून पूर्णेतील सर्व धार्मिक मिरवणुका व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन चांगले काम करत आहे त्याबद्दल त्यांचे सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ता कडून कौतुक  होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या