💥पुर्णा तालुक्यातील गौर ग्रामपंचायतीत रजाकारी कारभार : विकासासाठी आलेल्या निधीचा बोगसकामे करून गैरवापर....!


💥सरपंच ग्रामविकास अधिकारी व गुत्तेदाराचे संगनमत ? निकृष्ठ दर्जाची काम करून शासकीय विकासनिधीचा अपहार💥

पुर्णा (दि.२६ एप्रिल) - पुर्णा-चुडावा-नांदेड राज्यमार्गावरील साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या गौर या गावातील ग्रामपंचायतीला गावाच्या सर्वांगिन विकासाठी मागील पाच वर्षापासून सातत्याने कोट्यावधी रुपयांचा शासकीय विकासनिधी उपलब्ध झाल्यानंतर ही गावाचा म्हणावा त्या पद्धतीने विकास झाल्याचे निदर्शनास येत असून ग्रामपंचायत सरपंच सौ.पारवे व त्यांचे प्रतिनिधी अनंता पारवे व ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांनी गावातील विकासकामांचा निधी अत्यंत निकृष्ठ दर्जाचे रस्ते अंडरग्राऊंड नाल्यांसह पाणीपुरवठा योजनेसाठी आलेला कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी केवळ गागदोपत्री लाटल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित गावातील नागरिकांमध्ये तिव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मागील वर्षी गौर ग्रामपंचायतचे सरपंच पारवे व ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळ झोकण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचा निधी गावातील पाण्याच्या टाकीसह ग्रामपंचायत कार्यालयाला रंगरंगोटी करीत व जुनीच पाईपलाईन नव्याने बसवल्याचे भासवून लाखो रुपयांचा विकासनिधी चोरांच्या घशात घातल्याचे दिसत असून अश्याच प्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्यांची आवभगत करीत सोईस्कररित्या विकासनिधीची धुळधान करण्याचा सपाटा सरपंच पारवे व ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांनी सुरू केल्याने सदरील गावाचा विकास खुंटल्याचे दिसत असून गौर ग्रामपंचायतीला आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकासनिधीचा योग्य वापर झाला असता तर गावाचा निश्चितच सर्वांगीन विकास झाला असता असे स्पष्ट मत गावकरी मंडळींतून व्यक्त होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या