💥गौर ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणीपुरवठा योजनेच्या बोगस कामांवर यापुर्वी तब्बल ४ वेळा खर्च ?


💥गौर गावात तरीही पाण्याची गंभीर समस्या ; यावुर्वीच्या चारही पाणीपुरवठा योजनांचा कोट्यावधीचा निधी पाण्यात💥

पुर्णा (दि.२२ एप्रिल) - 'अनंत तुझे कुकर्म अन् अनंत तुझे पाप ? सोमेश्वराच्या कृपेने पावन झालेल्या गौर गावच्या विकासाला तुझ्याच तर कुकर्माचा जणू एक श्राप' अशी अवस्था पुर्णा तालुक्यातील पुर्णा-नांदेड राज्य मार्गावरील गौर नामक या गावाची झाली असून श्री सोमेश्वर महादेवाचे पावन पवित्र तिर्थक्षेत्रा मुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष केंद्रित करणाऱ्या व पुर्णा शहरापासून अवघ्या तिन ते चार किलोमीटर असलेल्या साडेचार हजार लोकसंख्येच्या या गावातील विकासाला भ्रष्ट लोकप्रिनिधींनी जणूकाही खिळ लावल्याचे निदर्शनास येत असून कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर ही गावातील ग्रामस्थांपुढे नागरी समस्यांचा जणूकाही डोंगरच उभा टाकल्याचे दिसत आहे.


गौर गावातील रस्ते नाल्यांसह पाणीपुरवठा योजनेसाठी आलेला शासकीय विकासनिधी बोगस निकृष्ट दर्जाची काम करून गिळकृत करण्याचे पाप ग्रामपंचायत सरपंच पारवे व ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांनी केल्यानेच गावातील विकासाला खिळ बसल्याचे निदर्शनास येत असून वन शहिदाच्या नावावर गावातील रस्ता/नाल्या व स्वागत कमानी साठी आलेला लाखो रुपयांचा निधी सुध्दा निकृष्ट दर्जाची काम करून गिळण्याचे पाप करण्यात आल्याचे दिसत आहे.


गौर गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या देखील सोडवण्याची क्षमता नसलेल्या ग्रामपंचायत सरपंच पारवे व ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांच्या कालावधीत यापुर्वी तब्बल चार वेळेस पाणीपुरवठा योजनेवर खर्च करण्यात आला ज्यात गौर गावाच्या काही किलोमीटर अंतरावरील नांदेड-पुर्णा राज्यमार्गावरील नरापूर या गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात ७० फुट खोल विहिर खोदून रस्त्याच्या बाजूच्या शेतांतून पाच इंची पाईप लाईन अंथरून पाणीपुरवठा योजना बिल उचलून खाण्यासाठी कार्यान्वित करण्याचे नाट्य रंगवण्यात आले परंतु सदरील पाणीपुरवठा योजना फोल ठरली यानंतर पिंपळगाव लिखा या गावातील गंगाजीबापू देवस्थान येथील गोदावरी नदीपात्रातून गौर गावापर्यंत पाच इंची पाईपलाईन अंथरून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्याचे नाट्य रंगवून शासकीय विकासनिधी हडप करण्यात आला ही पाणीपुरवठा योजना देखील फोल ठरली यानंतर गौर बस स्टॉप जवळील एका विठ्ठल पारवे नामक शेतकऱ्याच्या नदी शेजारील शेतात सार्वजनिक विहिर खोदून तिन इंची पाईप लाईन गावात अंथरून गावातील सार्वजनिक आड/विहिर तसेच सोमेश्वर महादेव देवस्थाना जवळील बारवात पाणी सोडून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्याचे नाट्य रंगवण्यात आले व शासकीय विकासनिधी गिळकृत करण्यात आला यानंतर पुन्हा गावातील सार्वजनिक रस्ते खोदून त्याच जुन्या पाईप लाईन व विहिरीचे नुतनीकरण दाखवू पाणी गावात आणून सार्वजनिक जलकुंभाला (पाण्याच्या टाकीला)  ) रंगरंगोटी करीतपाण्याचा प्रश्न सोडवण्याचे नाट्य रंगवून शासकीय विकासनिधी कागदोपत्री हडपण्याचा प्रकार घडला असतांनाच आता पुन्हा गौर ग्रामपंचायतला शासनाकडून जलजिवण मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी कोट्यावधीचा निधी प्राप्त झाला असून या योजनेचे काम गावात सुरू असून सदरील अत्यंत निकृष्ट दर्जाचे होतांना दिसत असून गावातील चांगल्या प्रकारचे रस्ते फोडून अवघ्या अर्धा ते एक फुटावर अंदाजपत्रकानुसार चार इंची पाईप लाईन न टाकता केवळ अडीच इंचाची निकृष्ट दर्जाची पाईप लाईन टाकल्या जात असून गावातील जुनी मजबूत पाण्याची टाकी बंद करून नव्याने पाण्याची टाकी बांधून पाणीपुरवठा योजनेत अपहार करण्याचा घाट घातल्या जात असल्यामुळे सदरील कामावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून गौर गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न कायम स्वरूपी सोडवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या