💥जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात व्याख्यान कार्यक्रम संपन्न....!


💥कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर श्रीधर भोंबे होते💥

जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी. रामपूरकर

जिंतूर च्याज्ञानोपासक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भारतीय संविधान या विषयावर डॉक्टर यशवंत खडसे यांचे 13 एप्रिल रोजी व्याख्यान झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर श्रीधर भोंबे होते. मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर यशवंत खडसे उपस्थित होते याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविधतेतून एकता असलेला आपला भारत देश एकसंघ ठेवण्यात भारतीय संविधानाची अतिशय महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर यशवंत खडसे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीधर भोंबे यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्राध्यापक संतोष कदम यांनी प्रास्ताविक केले तर प्राध्यापक डॉक्टर पंढरीनाथ धोंडगे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्राध्यापक डॉक्टर निवृत्ती पोपतवार यांनी आभार मानले. व्याख्यानास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या