💥परभणी जिल्ह्यात गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण मौजे कांगणेवाडी येथे संपन्न....!


💥या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मुंडे यांची प्रमुख उपस्थिती💥 

गंगाखेड ; तालुक्यातील राणीसावरगाव ग्रामपंचायत अंतर्गत मौजे कांगणेवाडी येथे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण श्रीनिवास मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले . दि. 16 मार्च रोजी बुधवार दुपारी दोनच्या दरम्यान माजी सैनिकांनी मानवंदना दिली. यावेळी या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी प्रमुख  उपस्थिती जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मुंडे,प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, समस्त गावकरी, लहान थोर मंडळी, ह्या अनोख्या सोहळ्यात उपस्थित होते. त्यानंतर फटाक्यांची अतिषबाजी फुलांची उधळण करण्यात आली.पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.हा पुतळा  उभारण्यात यावा यासाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले लोकवर्गणीतून हा पुतळा उभारण्यात आला.मौजे कांगणेवाडी गावची लोकसंख्या अंदाजे चारशे  असून हे गाव राणीसावरगाव पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेले आहे.गावात प्रवेश करताच हा पुतळा दिसून येतो. गोपीनाथराव च्या कारकिर्दीत येथील जन माणस त्यांच्यावर प्रेम करायचे, गोपीनाथराव  च्या अचानक  जाण्याने गावावर शोककळा  पसरली होती. त्याच वेळी ग्रामस्थांनी संकल्प केला, की स्वर्गीय गोपीनाथराव यांचा पुतळा कांगणे वाडीत  उभा करायचा.आज त्याचा शानदार सोहळा  संपन्न झाला. परभणी जिल्ह्यातील व गंगाखेड तालुक्यातील पहिला अर्धाकृती स्व गोपीनाथराव मुंडे साहेबांचा पुतळा उभारण्यात ग्रामस्थांना यश मिळाले  आहे. याचे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान व्यक्त होताना दिसत होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या