पाथरी स्व नितिन महाविद्यालयात विविध स्पर्धाचे बक्षिस वितरण....!


💥स्पर्धेत सहभागी विद्यार्थीनींना सौ आश्विनी कुणालराव लहाने यांच्या हस्ते बक्षिस वितरण करून सन्मानित करण्यात आले💥

✍🏻किरण घुंबरे पाटील

पाथरी:-येथील स्व. नितीन महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धां मध्ये सहभागी विद्यार्थीनींना संस्था सचिव कुणालराव लहाने यांच्या सुविद्य पत्नी सौ आश्विनी कुणालराव लहाने यांच्या हस्ते बक्षिस वितरण करून सन्मानित करण्यात आले.


जागतिक महिलादिना निमित्त रांगोळी स्पर्धा, कराटे प्रशिक्षण, भित्तिपत्रक प्रदर्शन , निबंध स्पर्धा, तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींन साठी आरोग्य तपासणी करण्यात आली होती. या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला.  कार्यक्रमांचे आयोजन डॉ. शितल गायकवाड व डॉ. अर्चना बदने, डॉ पवार शारदा, डॉ पवार सुरेखा, प्राध्यापक कदम व गिराम मॅडम या सर्व महिलांनी या कार्यक्रमाचे नियोजन बद्ध आयोजन केले होते. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या रीतीने प्रतिसाद दिला. नुकताच या कार्यक्रमा निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. उप प्राचार्या प्रा डॉ अर्चना बदने यांनी अध्यक्षिय समारोप केला. कार्यक्रमाचे सुत्र संचलन डॉ शितल गायकवाड यांनी केले तर आभार डॉ शारदा पवार यांनी मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या