💥गंगाखेडला कॉंग्रेसचे भाजपा कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन....!


🔹’मोदीजी शर्म करो’ घोषणांनी परिसर दणानला 🔹

गंगाखेड : मोदीजी शर्म करो, झुठ फैलाना बंद करो, अशा घोषणा देत गंगाखेड कॉंग्रेसने भाजपा संपर्क कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी टाळी, थाळी आणि घंटानाद करण्यात आला. पंतप्रधानांनी कॉंग्रेस आणि माहाराष्ट्राने कोरोना देशभर पसरवला, असे म्हणने म्हणजे चोरांच्या ऊलट्या बोंबा आहेत, अशी टीका यावेळी बोलताना कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केली. 


देशात कोरोना नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची होती. तेव्हा मोदीजींनी नमस्ते ट्रंप सारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले. ईतर अनेक राजकीय कार्यक्रम घेतले. कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांनी वेळोवेळी केलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष केले. याची परिणीती कोरोना वाढण्यात झाली. अचानक घोषीत केलेल्या लॉकडाऊन मुळे देशभरातील कामगार वर्ग हवालदिल झाला. या परिस्थितीत कॉंग्रेसने पक्ष म्हणून दिल्ली ते गल्ली जबाबदारी चोखपणे पार पाडल्याचे गोविंद यादव यांनी स्पष्ट केले. योवेळेत मोदीजी मात्र जनतेकडून टाळ्या, थाळ्या वाजवून घेत होते. दिवे लावत होते. 


असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र बेछूट आरोप करत स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न  करत आहेत. या बाबींचा निषेध करत तहसील समोर असलेल्या भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य संतोष मुरकुटे यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, नगरसेवक राजकुमार सावंत, युवा नेते सुशांत चौधरी, अ. जा. विभागाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळवे, युवक विधानसभा सचीव सिद्धार्थ भालेराव, साबेरभाई, सदाशिव कुंडगीर, संतोष समशेटे, युवक शहराध्यक्ष नागेश डमरे, सुर्यवंशी नेते, महेश मुंडे, बंटी राठोड, खलील मामू, अहेमदभाई गुत्तेदार, गोपानाथराव चव्हाण, अमजद पठाण, अजय कुकाले, मोहन खोले आदींसह कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते ऊपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या