💥जिंतूर तालुक्यातील बोरी सोसायटी च्या निवडणुकीमध्ये तेरा पैकी तेरा जागेवर बोर्डीकर गटाचे विजयी....!


💥या निवडणुकीमध्ये बोर्डीकर व भांबळे गटात अटीतटीची निवडणूक ; बोर्डीकर गटाने आपले वर्चस्व कायम राखले💥

जिंतूर / प्रतिनिधी

 परभणी जिल्ह्यामधील सर्वात मोठी ओळखले जाणारे जिंतूर तालुक्यातील बोरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये 13 पैकी 13 जागेवर बोडीकर गटाचे उमेदवार विजयी झाले या निवडणुकीमध्ये बोर्डीकर व भांबळे गटात अटीतटीची निवडणूक होऊन यामध्ये 13 पैकी 13 जागांवर आपले वर्चस्व कायम राखले दिनांक 6 फेब्रुवारी रोजी बोरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तेरा जागेसाठी आठ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आली यामध्ये एकूण मतदान 4142 पेकी 2019 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला या ठिकाणी एकूण मतदान 48 टक्के 74. एवढे मतदान झाले. तसेच संध्याकाळी नऊ वाजता निवडणुकीचा निकाल हाती आला यामध्ये विजयी उमेदवार चंद्रकांत भगवान चौधरी , अनंत श्रीरंगराव चौधरी, पंडित उत्तमराव घोलप, सुंदरराव लक्ष्मणराव देशमुख ,संजीवनी सुभाष ठमके ,लक्ष्मी साहेबराव मस्के, भगवान गणपती मानवते ,गंगाधर सोनाजी शिंपले ,अनिल भानुदास अंभुरे तात्यासाहेब रावसाहेब अंभुरे किशन मुंजाजी खापरे, मुरलीधर तुकाराम गाडेकर,

 कृष्णा लक्ष्मणराव घाटुळ हे उमेदवार विजयी झाले आहेत :-

 मतदान सुरू असताना दिवसभर मतदान केंद्राच्या बाहेर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते या मतदान दरम्यान भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची चे प्रकार घडले निवडणूक निर्वाचन अधिकारी डी एस हराळे सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून एम सी बावरी सहकारी विभागाचे एम यू यादव एम एस भोसले बी एस नांदापूरकर जिल्हा निवडणूक विभागाचे डी जी पठाण यांनी काम पाहिले तर यांना सहकार्य बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डी एन रोडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गोपने बोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद ज-हड पोलीस उपनिरीक्षक पंडित शिरसे त्यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या