💥वाशिम जिल्हयातील पोलीस अंमलदार यांची क्रिडा क्षेत्रात तसेच वार्षिक गोळीबार सरावात मोलाची कामगिरी...!


💥उल्लेखनीय कामगिरीबाबत कौतुकाची थाप देऊन सन्मानित करीत त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न💥 

✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह नेहमीच पोलीस अधिकारी/अमलदार यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत कौतुकाची थाप देऊन सन्मानित करुन त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करीत असतात.

                   दिनांक २४/१२/२१ ते २६/१२/२१ या कालावधीत विदर्भ पॉवर लिफ्टिंग असोशिएशन नागपुर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग प्रकारात वाशिम जिल्हयात कार्यरत महिला पोलीस अंमलदार ढोले ब.क्र १२०० आणि निलोफर बी शेख नशीर ब.क्र १४१६ यांनी सहभाग नोंदविला त्यात संगिता ढोले यांनी ४५ वेट कैटेगरी मध्ये एकुण २० खेळाडुपैकी १६५ स्फेटी टोलन पार करुन प्रथम क्रमांक प्राप्त करुन सुर्वण पदक पटकाविले तर निलोफर शेख यांनी ८४ वेट कॅटेगरी मध्ये एकुण ०५ खेळाडुमध्ये १९५५ स्फेटी टोलन पार करून द्वितीय क्रमांक प्राप्त करुन रौप्य पदक पटकाविले. पोलीस नाईक आशिष जयस्वाल बक्र ९३१ पोलीस मुख्यालय वाशिम यांनी दोन्ही खेळाडुना उत्कृष्ट मार्गदर्शन केले.


तसेच दरवर्षी प्रमाणे घेण्यात येणाऱ्या वार्षिक गोळीबार सराव देखील पोलीस अंमलदार यांनी आपले कौशल्य पणाला लावले. दिनांक ०७/०२/२०२२ ते १३/०२/२०२२ या कालावधीत वार्षिक गोळीबार सरावा करीता एकुण ४९ अधिकारी ६५३ अंमलदार असे एकुण ७०२ जवानांनी यांनी सहभाग नोंदविला त्यापैकी वार्षिक गोळीबार सरावामध्ये पुरुष गटात ७.६२ एम एम एस एल आर गृप/अॅप्लीकेशन फायर मध्ये पोस्ट रिसोड येथे कार्यरत पोशि १४३० अशोक कोटुळे यांनी प्रथम तर पोलीस मुख्यालय वाशिम येथे कार्यरत डिआय पोशि १२९१/ अमीर खान यांनी द्वितीय तर पोस्टे मंगरुळपीर येथे कार्यरत पोशि १५५/चंदन राठोड यांनी तृतीय क्रमांक पटकाविला, तर वाशिम जिल्हा पोलीस दलातील महिला ही मागे नसुन ७.६२ एम एम एस एल आर महिला गटात डि.आय मपोशि १२४२ वर्षा चव्हाण,डि आय मपोशि १४८१ / विश्वती पखाले, मपोशि १४८२ शर्विनी पखाले यांनी तृतीय क्रमांक पटकावुन बेस्ट फायरर म्हणुन सन्मानित करण्यात आले. अदयाप ही वार्षिक गोळीबार सराव सुरु असुन उर्वरित जवानामधील जे बेस्ट फायरर असतील त्यांना ही सन्मानित करण्यात येईल.

या कामगिरी बददल सर्वाचे मा. बच्चन सिंग पोलीस अधीक्षक वाशिम, मा. गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक वाशिम, राखीव पोलीस निरीक्षक पो मु. वाशिम मांगीलाल पवार,सहा प्रशिक्षक पोलीस किडा प्रशिक्षक आशिष जयस्वाल तसेच खेळाडूंचा सत्कार करून भविष्यात उज्ज्वल कामगिरी करीना शुभेच्छा दिल्या.मा. पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हा पोलीस दलाने भविष्यात सुरुदा अशाच प्रकारची भरीव कामगिरी करुन वाशिम जिल्हा पोलीस दलाचे नाव उंचाविण्याकरीता प्रोत्साहन दिले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या