💥पाथरी तालुका पत्रकार संघाच्या नुतन कार्यकारीनीची करण्यात आली निवड....!


💥तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक सामनाचे तालुकाप्रतिनिधी धनंजय आडसकर यांची निवड💥 

पाथरी (दि.०८ फेब्रुवारी) :-अखिल भारतीय मराठी पत्रपरीषद सग्नीत पाथरी तालुका पत्रकार संघाची नुतन कार्यकारीनीची निवड ७ फेब्रुवारी रोजी जेष्ठ पत्रकार दत्तराव उपाडे यांच्या अध्यक्षते खाली येथील पंचायत समिती कॉम्पलेक्स मधील पत्रकार भवन येथे संपन्न झाली.

या वेळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक सामनाचे तालुकाप्रतिनिधी धनंजय आडसकर यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी मिर्झा अब्दूल्ला बेग उर्फ पाशा बेग सचिव पदी दत्तराव उपाडे पत्रकार संघाचे सल्लागार तथा जिल्हाप्रतिनिधी म्हणून किरण घुंबरे पाटील सह सचिव विठ्ठल प्रधान उपकोषाध्यक्ष गुलाम मुस्तफा अन्सारी सदस्य म्हणून कृष्णा कांबळे,औरंगाबाद टाईम्सचे मिर्झा वजाहत बेग यांची निवड करण्यात आली.नुतन कार्यकारीणीची सत्कार जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा पाथरी पं स चे सभापती सदाशिव थोरात यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे करण्यात आला या वेळी नुतन कार्यकारीनीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या