💥आ.संतोष बांगर साहेब यांच्या शुभहस्ते मौजे साटंबा येथे कबड्डीच्या भव्य सामन्यांचे उदघाटन मोठ्या थाटात संपन्न.....!


💥युवकांनी,खेळाडूंनी व्यसनापासून नेहमीच दूर राहिले पाहिजे - आ.संतोष बांगर


✍🏻शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

आज हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या शुभहस्ते मौजे साटंबा येथे  कबड्डीच्या भव्य सामन्यांचे उदघाटन मोठ्या थाटात संपन्न झाले.यावेळी बोलताना आमदार संतोष बांगर साहेब म्हणाले की कबड्डी म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल खेळ आहे म्हणून युवकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कबड्डी खेळली पाहिजे तसेच खेळाडूंनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे आणि कोणताही खेळ खेळताना उत्तेजकाचे सेवन टाळले पाहिजे असा मौलिक सल्ला आमदार बांगर साहेबांनी उपस्थित खेळाडूंना दिला.


         यावेळी जि.प.अध्यक्ष गनाजीराव बेले, सह संपर्कप्रमुख डॉ.रमेश शिंदे,माजी जि.प.उपाध्यक्ष उद्धवजी गायकवाड, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे,तालुकाप्रमुख भानुदासराव जाधव,जि.प.सदस्य सौ.मंगलताई कांबळे,सौ.रेखाताई देवकते, श्यामराव जगताप,राजू नागरे,पंढरी मगर,नितीन होकर्णे,मारोतराव कोरडे, श्यामराव जगताप,दत्तराव घ्यार,ज्ञानदेवराव जगताप,तुकाराम जगताप,शिवराज जगताप,सरपंच इंगोले, प्रीतम सरकटे,दत्तराव घ्यार,बाबाराव जगताप  शंकरराव भवर रामचंद्र घ्यार नारायण घ्यार,गजानन घ्यार,मारोती घ्यार,जयकुमार घ्यार,सुरेश बद्री,विलास गिरी,प्रताप गिरी,राधेश्याम घ्यार,गणेश घ्यार,गणेश आठवले व मोठ्या संख्येने  ग्रामस्थ,क्रीडाप्रेमी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या