💥सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निश्क्रियतेचा अनोखा निषेध ; चक्क जुन्या पुलाचे प्रतिकात्मक पिंडदान व गोड जेवण आंदोलन...!💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलकांकडून सा.बां.विभागाच्या निश्क्रिय अधिकाऱ्यांना सुध्दा कार्यक्रमाचे निमंत्रण💥

परभणी (दि.१२ फेब्रुवारी) - तालुक्यातील परभणी ते साडेगाव रस्त्यावर मांगणगाव जवळील नाल्यावरील पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने नेमलेल्या कंत्राटदाराने  फूल अर्धवट बांधून सोडून दिले आहे असून मागील ८-९ वर्षा पासून हा पूल असाच अर्धवट अवस्थेत असून त्यावर आत्ता मोठमोठे झाडे उगवली असून पुलाच्या काँक्रिट ची राख व्हायला सुरुवात झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोमवार दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ९ वाजता परभणी - साडेगाव रस्त्यावरील मांगनगाव येथील खंडहर झालेल्या पुलाला पाडून तेथे तत्काळ नविन पुल बांधण्यात यावा मागणीसाठी *भग्न अवस्थेतील मांगनगाव येथील जुन्या पुलाचे प्रतिकात्मक पिंडदान व गोड जेवण करून आंदोलन* प्रहार जनशक्ती पक्ष व परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री. डी. जी. पोत्रे साहेब, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी व प्रमुख पाहुणे म्हणून श्री. ए. एम. विघ्ने साहेब, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी यांना निमंत्रित करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या असून परिसरातील गावागावात या कार्यक्रमाच्या पत्रिका मांगणगाव, साडेगाव, वाडीदमई, सावंगी खुर्द, बाबडे टाकळी, जोडपरळी व पिंगळी कोथळा या  गावातील सोशल मीडिया व कार्यकर्त्यांच्या वतीने प्रत्येक्ष वाटण्यात येत आहेत. या लक्षवेधी कार्यक्रमाचे आयोजन प्रहार जनशक्ती पक्ष व परिसरातील गावकरी यांच्या वतीने करण्यात आले असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बालासाहेब तरवटे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, वाहतूक आघाडी तालुका प्रमुख रामेश्वर जाधव, मिडिया प्रभारी नकुल होगे, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर पुंजारे, शहर चिटणीस वैभव संघई इत्यादींनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या