💥पुर्णा नगर परिषद प्रशासनाचा अनागोंदी कारभार ; अपंग कल्याण निधीचे अपंगांना मागील दोन वर्षापासून वाटप नाही....!


💥अपंगांना अपंग कल्याण निधीसह युआयडी कार्डचे तात्काळ वितरण करा ; प्रहार अपंग क्रांती संघटनेची मागणी💥

पुर्णा (दि.१६ फेब्रुवारी) - शहरातील विविध भागात विकासाच्या नावावर थातुरमातूर कामे करून कोट्ट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीची सोईस्कररित्या विल्हेवाट लावून या बोगस कामांच्या बिलांवर टक्केवारीच्या लालसेपोटी डोळे मिटून स्वाक्षरी मारणाऱ्या नगर परिषद प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मागील दोन वर्षापासून असंख्य अपंगांना अपंग कल्याण निधीपासून वंचित ठेवल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या संदर्भात प्रहार अपंग क्रांती संघटनेने नगर परिषदेचे विद्यमान प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसिलदार बि.नितेशकुमार यांना दि.१५ फेब्रुवारी रोजी लेखी स्वरूपात निवेदन देऊन अपंगांना अपंग कल्याण निधीसह युआयडी कार्डचे तात्काळ वितरण करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

या संदर्भात प्रहार अपंग क्रांती संघटने कडून देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की नगर परिषदेला प्राप्त निधी पैकी ५% निधी हा शहरी भागातील अपंगांना त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी वितरीत करण्याचे आदेश शासनाकडून सन २०१८ या वर्षी प्राप्त झाले त्या आदेशा अनुसार सन २०१९/२० या वर्षी तत्कालीन मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी शशहरातील सर्व अपंगांचा सत्कार करून त्यांना दिपावली सनाची भेट म्हणून सर्व अपंगांना त्यांची अपंगत्वाची टक्केवारी पाहून निधी वाटप केला होता परंतु त्यानंतर मात्र कोरोना संक्रमनाची साथ देशासह राज्यातही पसरल्यामुळे याकडे कोणीही लक्ष दिले नाही त्यामुळे असंख्य अपंग बांधवांवर उपासमारीची वेळ आल्याचे निदर्शनास येत आहे.

शहरातील अपंगांच्या या गंभीर परिस्थितीकडे नगर परिषद प्रशासनासह जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात अपंगाच्या हितास्तव अनेक मागण्या करण्यात आल्या असून यात असे नमूद करण्यात आले आहे जिल्ह्यातील सर्व शहरीभागांसह ग्रामीण भागातील अपंगांना युआडी कार्डचे वाटप करण्यात आले आहे परंतु पुर्णा शहरातील अपंगांना अद्यापही युआयडी कार्डचे वाटप करण्यात आलेले नाही तरी वरिष्ठ स्तरावर पाठ पुरावा करून पुर्णा शहरातील अपंगांना युआयडी कार्डचे वाटप करण्यात यावे,पुर्णा शहरात अनेक अपंग व्यक्ती असून त्यांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत त्वरित घरकूल मंजूर करण्यात यावे,सुवर्ण जयंती योजने अंतर्गत अपंगांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन त्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मंजूर करून देण्यात यावे,पुर्णा नगर परिषदेच्या शहरातील मालकीच्या जागेवर अपंगासाठी विशिष्ट जागा आरक्षित करून त्यांना उद्योग/व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावे जसे की परभणी महानगर पालिकेने अपंगांच्या स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे,पुर्णा नगर परिषदेच्या नवीन इमारतीत तळ मजल्यावर अपंगिंसाठी एक स्वतंत्र कक्षाची निर्मिती करावी जेणेकरून अपंगांना त्रास होणार नाही आठवडा भरात अपंगांचे जेवढी निवेदन येतील त्यावर मुख्याधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष देऊन अपंगांच्या प्राप्त तक्रारींची शहानिशा करून आठ दिवसात तक्रारी निकाली काढाव्यात अशीही मागणी निवेदनात करण्यात आली असून या निवेदनावर किशोर सुर्यवंशी,रत्नाकर जोशी,बालाजी कदम,मुंजाजी सोळंके,बळीराम सुर्यवंशी,सय्यद अबरार सय्यद गफ्फार आदींच्या स्वाक्षरी आहेत.... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या