💥पाथरी येथील स्व.नितीन महाविद्यालयात सेवाभाया जयंती उत्सव....!

                


💥सेवाभाया हे बंजारा समाजातील क्रांतिकारी पुरूष💥 

पाथरी - स्व. नितीन महाविद्यालय,पाथरी राज्यशास्त्र विभागाच्या वतीने सेवाभाया जंयती उत्सव साजरा करण्यात आला सेवाभाया हे बंजारा समाजातील क्रांतिकारी पुरूष असुन संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा संकल्प त्यांनी केला होता.

 'कोई केती मोठो छेई कोई बारक्या छेयी ,जाणजो छांळजो अन पचज मानजो,तम स्वता तमारे जिवनेम दिवा लगाड सकोचो असे तत्वज्ञान त्यांनी दिलेले आहे या वेळी निंबध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.राम फुन्ने यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले या वेळी उपप्राचार्य डॉ.अर्चना बदने,डॉ.अंकुस सोळंके,प्रा.तुलसीदास काळे डॉ.मधुकर ठोंबरे,प्रा. ठाकुर संजयसिंग,डॉ.खेडेकर,प्रा.गणेश कचरे,डॉ.पवार,सुनील लहाने यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन डॉ.साहेब राठोड यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या