💥पुर्णा तालुक्यातील आलेगाव येथे रोहयो योजनेत विहिरीचे खोदकाम दाखवून रक्कम उचलून शासनाची फसवणूक.....!


💥जिल्हाधिकारी यांच्या लेखी आश्वासना नंतर सुध्दा अद्यापही संबंधिता विरोधात कारवाई नाही💥

पुर्णा (दि.०४ फेब्रुवारी) - तालुक्यातील आलेगाव (सवराते) येथील एका महाभागाने शासनाच्या रोजगार हमी योजनेत विहिरीचे खोदकाम केल्याचे दाखवून शासकीय रक्कम उचलून शासनाची शुद्ध फसवणूक केल्या प्रकरणी येथील तक्रारदार शिवाजी खरे यांच्याकडून जिल्हाधिकारी आंचल गोयल परभणी यांच्या कार्यालया समोर दि.२५ जानेवारी २०२२ रोजी उपोषण करण्यात आले होते यावेळी त्यांना जिल्हा प्रशासना मार्फत लेखी स्वरुपात आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास विनंती करण्यात आली परंतु जिल्हा प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासना नंतर सुध्दा अद्यापही संबंधिता विरोधात कारवाई करण्यात आलेली नाही.   

सविस्तर वृत्त असे की पूर्णा तालुक्यातील मौजे आलेगाव येथील तक्रार अर्जदार शिवाजी खरे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात मैजे आलेगाव येथील विस्वनाथ देवराव सवराते यांनी गट नं.२४७ क्षेत्र १.२२ हे जमीनीत विहिरीचे खोदकाम केल्याचे दाखवून राष्ट्रीय रोजगार योजनेत शासकीय रक्कम उचल केली आसून सदर जागेत विहिरीचे काम झाले नसल्याने सदर कामाची चौकशी करुन कार्यवाही करण्याच्या मागणी साठी ते दि.२५ जानृवारी २०२२ रोजी सायंकाळी उपोषणास बसले व दि.26.1.2022 रोजी दुपारी ऐक वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोरील आमरण उपोषण कार्यवाही करन्याच्या आस्वासन पत्रा नंतर त्यांनी मागे घेतले आसल्याचे शिवाजी खरे यांनी माध्यमासी बोलतांना सांगितले सबंधीत आधीकारी या कार्यवाहीच्या पत्राचा गांभीर्यांनी विचार करुन दोषींवर कार्यवाही करतील कि या पत्राला केराची टोपली दाखवतील ? याकडे त्या परीसरातील नागरीकांनमध्ये फार मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या