💥पुर्णा तालुक्यातील मौ.भाटेगाव येथे शेतकरी गोष्टी कार्यक्रम संपन्न....!


💥या कार्यक्रमात गावचे सरपंच माधव बालासाहेब कराळे यांची प्रमुख उपस्थिती💥

पुर्णा (दि.१६ फेब्रुवारी) : तालुक्यातील मौजे भाटेगाव येथे आज बुधवार दि.१६ फेब्रुवारी २०२२ रोजी शेतकरी किसान गोष्टी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात गावचे सरपंच माधव बालासाहेब कराळे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्री तांबिले आर एच यांनी केले यामध्ये गांडूळ शेड तसेच कृषी विभागाच्या योजनांची माहिती सांगितली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री जोशी व्ही सी यांनी केले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ श्रीनिवास कारले यांनी मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये गोठ्याचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले तसेच डॉ कनले एल टी यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेसंबंधी माहिती सांगितली श्री जोशी यांनी आत्मा अंतर्गत जास्तीत जास्त गट स्थापन करण्याविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री माने आर डी यांनी केले या कार्यक्रमास कृषी सहाय्यक श्री परसोडे ग्राम रोजगार सेवक अनिल कराळे तसेच डॉक्टर भुरके, सामाजिक कार्यकर्ते संतोष कऱ्हाळे उप सरपंच रामराव कऱ्हाळे कुंडलिक कऱ्हाळे पांडुरंग कऱ्हाळे धोंडीराम कऱ्हाळे सुभाष डफुरे राजेश कऱ्हाळे तसेच गावातील शेतकरी उपस्थिती होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या