💥पुर्णा तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने वाईन विक्री विरोधात स्वाक्षरी मोहीम...!


💥राज्य सरकारने किराणा मॉलमधून वाईन विक्रिस दिलेल्या परवानगी विरोधात राबवण्यात येत आहे स्वाक्षरी मोहीम💥


पूर्णा, प्रतिनिधी/

                  किराणा दुकानांवरून होवू घातलेल्या वाईन विक्रीविरोधात संताप वाढतच चालल्याचे दिसत आहे. हा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी तर्फे जोरदार स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून पूर्णा शहरात महिलांच्या,नागरिकांच्या सह्या घेऊन हे निवेदन राज्यपालांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिली.


             राज्य सरकारने किराणा मॉलमधून वाईन विक्रिस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात सर्वच स्तरातून तीव्र विरोध होत असतानाही राज्य सरकारकडून तसे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत. यामुळे किराणा दुकानांतून दारू विक्री सुरू होणार आहे. हा निर्णय महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचा संतापजनक प्रकार आहे. अशा दारू विक्रिमुळे तरूण पीढी व्यसनाधीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरा-घरात वाद वाढणार असून सामाजीक शांतता भंग पावण्याचा धोकाही वाढला आहे. हे होवू नये यासाठी जिंतूरच्या आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्णेतील भाजपा च्या वतीने स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक गावात जावून या अनुषंगाने जनजागृती केली जाणार असून महिलांच्या सह्या घेतल्या जाणार आहेत. हे निवेदन घेवून आपण राज्यपाल भगतसींह कोशारी यांची भेट घेणार आहोत. महिलांच्या भावना लक्षात घेवून हा निर्णय रद्द करणेबाबत राज्यपालांना विनंती केली जाणार असल्याची माहीती आ. बोर्डीकर यांनी दिली आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अनंता पारवे ,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अजय ठाकू,शहराध्यक्ष प्रशांत कापसे,आई.टी.सेल जिल्हा संयोजक भारत एकलारे, जिल्हा संयोजक विजय कराड,युवा जिल्हा उपाध्यक्ष विनय कराड,युवा तालुकाध्यक्ष देवानंद वळसे , शहराध्यक्ष विश्वनाथ होळकर,सरपंच सुनील माइंदले,तालुका गोविंद ठाकूर, आशुतोष अग्रवाल,धनंजय कराले,अन्नपूर्णा पूरी,लक्ष्मीबाई पूरी,निर्मला परदेशी,भगवती पूरी आदी नागरिक स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या